Aditya Thackeray and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

तुम्हाला बाळासाहेबांशी नात सांगण्याचा अधिकार नाही; फडणवीस आदित्य ठाकरेंवर कडाडले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यावर कधीनव्हे तो कडाडून टीका केली. तसेच तुम्हाला बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा अधिकार नसल्याचं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis news in Marathi)

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. याच यात्रेत राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्यावर टीका केली होती. हाच धागा पकडून फडणवीस यांनी आदित्य यांच्या भारत जोडो यात्रेतील सहभागावर टीका केली.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. त्याच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. हे पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असंही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेच बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचं म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: तुम्ही इतके स्वस्त आहात का? आमच्या लोकांना ४ कोटी आगाऊ अन् दरमहा १ कोटी; ठाकरेंच्या खासदारांना सवाल!

Monorail: मोनोरेल सुरू होणार पण प्रवाशांच्या खिशाला कात्री, तिकीटांच्या किंमती वाढणार? नवे दर किती आणि कधीपासून लागू?

लग्न होऊनही 5 वर्षांपासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतेय रसिका सुनील, नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इम्तियाज जलील यांच्या विधानाला ठाकरे गटाचा पाठिंबा, देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप

Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात पाणीबाणी, एकाच वेळी सर्व योजना बंद पडण्याची इतिहासात पहिलीच घटना; भोगावती, पंचगंगेच्या पातळीत मोठी घट

SCROLL FOR NEXT