helpline sakal
महाराष्ट्र बातम्या

तुम्ही आताच ‘हे’ नंबर तोंडपाठ करा! कधीही अडचण पडल्यास काही वेळातच मिळेल हमखास मदत

अपघात झाल्यावर किंवा इतर गंभीर व्यक्तींना वैद्यकीय मदत कोणत्या क्रमांकावर मिळते, याची माहिती असणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर सर्व व्यक्तींना काही क्रमांक तोंडपाठ असणे आवश्‍यक आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अडचणीतील व्यक्तींना पोलिसांची मदत कशी मिळवायची, त्यासाठी मोबाईलमधील रिचार्ज संपलेला असतानाही कॉल लागतो याची माहिती बहुधा नसते. आपल्या आजूबाजूला अवैध दारू विक्री होते आणि त्याचा त्रास सर्वांनाच सोसावा लागतो, मग अशावेळी कोणत्या क्रमांकावर कॉल करून तक्रार करायची, गावात बालविवाह होतोय तर त्याची तक्रार कोठे करायची याची देखील माहिती नसते. अपघात झाल्यावर किंवा इतर गंभीर व्यक्तींना वैद्यकीय मदत कोणत्या क्रमांकावर मिळते, याची माहिती असणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर सर्व व्यक्तींना काही क्रमांक तोंडपाठ असणे आवश्‍यक आहे.

कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर अनेकांना वैद्यकीय तज्ज्ञांचा मानसिक सल्ला जरुरी बनला आहे. तर शिक्षण घेताना किंवा परीक्षेनंतर आलेल्या अपयशामुळे देखील तरुण- तरुणींना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मानसिक सल्ला जरुरी असतो. महामार्गावरून जाताना गंभीर अपघात झाल्यावर जखमींना वेळेत उपचार मिळाल्यास त्या रुग्णांचा जीव वाचू शकतो.

गर्भवतींना रूग्णालयात नेण्यासाठी देखील आरोग्य विभागाने टोल फ्री क्रमांक दिला आहे. हे क्रमांक माहिती असल्यास आपत्कालीन परिस्थिती तातडीने मदत मिळू शकते. आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री किंवा दारू वाहतूक होत असल्यास त्याची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करता येईल. त्यासाठी त्यांचाही टोल फ्री क्रमांक आहे. बालविवाह, लाच प्रकरणात संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी कोणालाही त्या त्या विभागांच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार करता येते. असे क्रमांक तोंडपाठ असणे किंवा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवणे काळाची गरज बनली आहे.

प्रत्येकालाच ‘या’ क्रमांकाचा होईल लाभ

  • - बालविवाह रोखण्यासाठी : १०९८

  • - लाच प्रकरणी तक्रारीसाठी : १०६४

  • - पोलिस मदतीसाठी : ११२

  • - अवैध दारूच्या तक्रारीसाठी : १८००२३३९९९९

  • - आपत्कालीन वैद्यकीय सेवा : १०८

  • - आरोग्य सल्ला, रक्ताची उपलब्धता : १०४

  • - गर्भवतींसाठी मोफत रुग्णसेवा : १०२

  • - आग लागल्यावर मदत : १०१

  • - म.फुले जनआरोग्य योजना : १५५३८८

  • - गर्भधारणापूर्व निदान : १८००२३३४४७५

  • - आरोग्याविषयीचा राष्ट्रीय कॉल सेंटर : ९१-११-२३९७८०४६

  • - ‘ई-संजीवनी’ आरोग्याचा सल्ला : १०७५

  • - मानसिक आरोग्य पुनर्वसनाचा सल्ला : १८००५००००१९

  • - कोरोनाविषयी माहिती : १०४

  • - व्यसनमुक्ती : १८००११२३५६

  • - क्षयरोग विषयी मार्गदर्शन : १८००११६६६६

  • - कुष्ठरोग विषयक मार्गदर्शन : ०२२-२४११४०००

  • - महिला व बालविकास विषयक सेवा : ८०८०८०९०६३

  • - आपत्ती व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन : १०७७

पोलिसांची मदत १५ मिनिटांतच

शहर असो वा ग्रामीण भागातील व्यक्तींवर काही संकट ओढवल्यास त्यांना पोलिसांच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क करून मदत मिळविता येते. शहरातील संकटग्रस्त व्यक्तींना अवघ्या १० मिनिटात तर ग्रामीणमधील व्यक्तींना १५ ते २० मिनिटांत मदत मिळते. त्यामुळे प्रत्येकांनी विशेषतः मुली- महिलांनी ११२ हा क्रमांक तोंडपाठ करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT