sangola Esakal
महाराष्ट्र बातम्या

मोहात पडला नाही; सापडलेले लाखो रुपये केले परत, सांगोल्याच्या तरुणाचं होतंय कौतुक

सांगोल्यातील तरुण गुलाब शिंदेच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

अंकिता खाणे (Ankita Khane)

गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातून सव्वा लाखांची रक्कम असलेली पिशवी सांगोला शहरातील वासूद रोड पाण्याच्या टाकीजवळ अनावधानाने पडते. ती पिशवी घराकडे चाललेल्या एका तरुणाला सापडते. थोड्यावेळाने आपल्या हातून पिशवी पडल्याचे लक्षात आल्यानंतर ते दोन तरुण शोधाशोध करू लागतात. त्या तरुणांच्या चेहऱ्यावरील भाव लक्षात घेऊन लगेचच सापडलेल्या तरुणाने त्यांना ती सव्वा लाख रुपयांची बॅग परत केली.

सापडलेले सव्वा लाख रुपये परत करून सांगोल्यातील गुलाब मच्छिंद्र शिंदे या तरुणाने प्रामाणिकपणाचा एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. सोशल मीडियावरही या प्रामाणिकपणाबाबत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुनोनी येथील गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या दोन तरुण युवक कर्मचाऱ्यांची एक लाख २५ हजार रुपये रोख रकमेची पिशवी वासूद रोड पाण्याच्या टाकीजवळ अनावधानाने पडली होती.

याचवेळी रस्त्यावर रात्री ११ च्या सुमारास फिरून झाल्यावर घराकडे परत जात असताना गुलाब शिंदे या तरुणाला ती पिशवी आढळून आली. पिशवीत पाहिल्यानंतर रक्कम आढळून आली. त्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ दोन युवक अस्वस्थ चेहऱ्याने रस्त्याने वारंवार फिरत असताना आढळून आले. त्या दोन युवकांच्या चेहऱ्यावर भेदरलेले भाव गुलाब शिंदेने अचूक टिपले. त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहात नाराजीचे कारण विचारत अंदाज घेतला.

विचारपूस करत असताना त्या दोन युवकांनी साश्रुनयनांनी एक लाख २५ हजार रुपये हरवल्याची कहाणी सांगितली. त्यांच्या शब्दातील वास्तव गुलाब शिंदेच्या विश्वासास पात्र ठरली. पैसे त्यांचेच असल्याची खात्री केली आणि कुठल्याही मोहाला बळी न पडता सव्वा लाख रुपयांची पिशवी लगेचच त्यांच्या स्वाधीन केली.

गुलाब शिंदे याने केलेल्या कार्याने त्याच्या घरचेच नाही तर सांगोला तालुक्याची मान उंच केली आहे. गुलाब शिंदे यांचे सांगोला तालुक्यासह परिसरातून कौतुक केले जात आहे.

‘आजच्या या जगात लोक हक्काचे पैसे बुडवायला कमी करत नाहीत तर कोणा अनोळखी व्यक्तीचे पैसे परत करण्याचा विचार करणारी मोजकीच लोक या जगात आहेत. खरंच त्याबद्दल गुलाब शिंदे यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे’, अशा शब्दांत त्यांच्या प्रामाणिकपणाचे सोशल मीडियावर दिवसभर कौतुक होत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT