पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी Sakal
महाराष्ट्र बातम्या

तरुणांनो, पोलिस भरतीची जोरदार करा तयारी! १२ डिसेंबरला मैदानी; जानेवारीत लेखी परीक्षा

पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे. १२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे. १२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या, पण भरती प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे. उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत. दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे. प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे. परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे. भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.

पोलिस भरतीची स्थिती

  • एकूण जागा

  • १७,१३०

  • अर्ज करण्याची मुदत

  • ३० नोव्हेंबर

  • मैदानी चाचणीची तारीख

  • १२ डिसेंबर

  • ‘लेखी’चा संभाव्य महिना

  • जानेवारी २०२३

नॉन क्रिमेलिअरची चिंता नको...

पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्यासंदर्भातील नॉन क्रिमेलिअर सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने १ एप्रिल २०२१ ते २१ मार्च २०२२ या काळातील नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत असावी, अशी अट घातली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आता ती मुदत संपून गेली अन्‌ तेव्हाचे क्रिमेलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला. काही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देखील दिली. पण, मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमेलिअर भरतीसाठी चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT