police bharati sakal news
महाराष्ट्र बातम्या

तरुणांनो तयारीला लागा, पोलिस भरतीची फेब्रुवारीपासून मैदानी! राज्यात एका पदासाठी ११३ उमेदवार; सोलापूर शहरात जागा ७९ अन्‌ अर्ज ४१५१; बँड्‌समनसाठी एक तृतीयपंथी

सोलापूरसह राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर सुरू होईल. महापालिकेनंतर ३१ जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारीत मैदानी चाचणी सुरू होईल आणि पावसाळ्यापूर्वी मैदानी संपविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. उमेदवारांच्या अर्जांची संख्या राज्यात १६ लाख ७० हजारांपर्यंत असल्याने मैदानी चाचणीसाठी अंदाजे चार महिने लागतील.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती होत असून, त्यात सोलापूर शहर पोलिस दलातील ७९ आणि ग्रामीण पोलिसांकडील ९५ पदे आहेत. पोलिस भरतीसाठी राज्यभरातून एका पदासाठी तब्बल १०६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये हे प्रमाण एका पदासाठी ५० उमेदवार असे आहे. सोलापूर शहरात एका पोलिस शिपाई पदासाठी ४३ तर बँड्‌समनच्या एका पदासाठी १६९ उमेदवार आहेत.

सोलापूरसह राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर सुरू होईल. महापालिकेनंतर ३१ जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारीत मैदानी चाचणी सुरू होईल आणि पावसाळ्यापूर्वी मैदानी संपविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. उमेदवारांच्या अर्जांची संख्या राज्यात १६ लाख ७० हजारांपर्यंत असल्याने मैदानी चाचणीसाठी अंदाजे चार महिने लागतील.

मैदानी पार पडल्यावर पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. दरम्यान, सोलापूर शहरातील पोलिस शिपायांच्या ७३ पदांसाठी पुरुष उमेदवारांचे दोन हजार ४८८, महिला उमेदवारांचे ६२० आणि माजी सैनिक उमेदवारांचे २६ अर्ज आहेत. दुसरीकडे, बँड्‌समनच्या सहा पदांसाठी पुरुष उमेदवारांचे ७८५, महिला उमेदवारांचे २२७ आणि तृतीयपंथी उमेदवाराचा एक अर्ज असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली.

सोलापूर शहरातील स्थिती

  • पोलिस शिपाई भरती

  • ७३

  • पोलिस बँड्‌समन

  • शिपाई पदासाठी अर्ज

  • ३,१३४

  • बँड्‌समनसाठी अर्ज

  • १,०१७

फेब्रुवारीत होणार मैदानी चाचणी

फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी सुरू होईल. त्यानंतर सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यभरात एकाचवेळी होणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून एका पदासाठी १० उमेदवारांची लेखी चाचणीसाठी निवड होईल. दरम्यान, ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले आहेत, त्याची पडताळणी सध्या सुरू आहे. एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांचा एकच अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.

शारीरिक चाचणीचे स्वरूप...

  • (पुरुष उमेदवार)

  • १६०० मीटर धावणे : २० गुण

  • १०० मीटर धावणे : १५ गुण

  • गोळाफेक (७.२६ किलो) : १५ गुण

  • एकूण गुण : ५०

  • ---------------------------------------------

  • (महिला उमेदवार)

  • ८०० मीटर धावणे : २० गुण

  • १०० मीटर धावणे : १५ गुण

  • गोळाफेक (४ किलो) : १५ गुण

  • एकूण गुण : ५०

Vijay Hazare Trophy: नाशिकचा गोलंदाज इतिहास घडवतोय! 'अशी' कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला

Pregnancy Criminalization Case : बाळाचा गर्भातच मृत्यू, महिलेला १८ वर्षांची शिक्षा, पण आता या एका दाव्याने निकाल पलटला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Update : किल्ल्यांवर 'थर्टी फर्स्ट'ला बंदी गैरप्रकार टाळण्यासाठी वन विभागाकडून गस्त,बंदोबस्तात वाढ

Happy New Year 2026 Wishes: नववर्ष 2026 ची सुरुवात करा प्रेमाने! मित्र-परिवाराला पाठवा मनापासूनच्या शुभेच्छा, वर्ष होईल खास

Bank Holiday : आज वर्षाचा शेवटचा दिवस! ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला बँका बंद की सुरू? बँकेत जाण्याआधी हे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT