पोलिस भरती Sakal
महाराष्ट्र बातम्या

तरुणांनो, पोलिस भरतीची ऑक्टोबरअखेर मैदानी चाचणी! एका पदासाठी १० उमेदवारांची लेखीसाठी होईल निवड, मैदानी अन्‌ लेखी चाचणी कशी असणार, वाचा...

राज्यातील १५ हजार पोलिसांच्या भरतीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील रिक्तपदे भरली जाणार आहेत. भरतीची सुरुवात ऑक्टोबरपासून सुरु होणार असून नोव्हेंबरमध्ये मैदानी चाचण्या घेण्याचे गृह विभागाचे नियोजन आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील १५ हजार पोलिसांच्या भरतीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील रिक्तपदे भरली जाणार आहेत. भरतीची सुरुवात ऑक्टोबरपासून सुरु होणार असून नोव्हेंबरमध्ये मैदानी चाचण्या घेण्याचे गृह विभागाचे नियोजन आहे. या पोलिस भरतीतून सोलापूर शहराला अंदाजे ६०, सोलापूर ग्रामीण पोलिसांना ९० आणि राज्य राखीव पोलिस बल क्रमांक दहा यांना २५ ते ३०, असे एकूण सोलापूर जिल्ह्याला १८० नवे अंमलदार मिळणार आहेत.

पोलिस भरतीत सुरवातीला मैदानी चाचणी घेतली जाते. मैदानीत किमान ४० टक्के गुण मिळालेल्या उमेदवाराची निवड लेखी चाचणीसाठी होते. एकूण रिक्त पदभरतीतील एका पदासाठी १० उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाते. त्यानंतर मेरिटनुसार दोन्ही चाचण्यामंध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्यांची निवड पोलिस अंमलदार म्हणून होते. या भरतीसाठी अर्जाचे शुल्क एक हजार रुपये असणार आहे.

लेखी व मैदानी चाचण्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. विशेष बाब म्हणजे एका उमेदवारास एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये केलेले अर्ज बाद ठरविले जातील. मैदानी चाचण्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या नियोजनानुसार होतील, पण लेखी परीक्षा (मुंबई वगळून) संपूर्ण राज्यभरात एकदाच होणार आहे. मागील एक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक तरुण-तरुणी पोलिस भरतीची तयारी करीत असल्याचे चित्र आहे.

पोलिस शिपाई पदासाठी...

  • (शारीरिक चाचणी - महिला)

  • ८०० मीटर धावणे : २० गुण

  • १०० मीटर धावणे : १५ गुण

  • गोळाफेक : १५ गुण

  • एकूण गुण : ५० गुण

  • --------------------------------------------------------------------

  • (शारीरिक चाचणी - पुरुष)

  • १६०० मीटर धावणे : २० गुण

  • १०० मीटर धावणे : १५ गुण

  • गोळाफेक : १५ गुण

  • एकूण गुण : ५० गुण

  • -------------------------------------------------------------------

चालक शिपाई पदासाठी...

  • (शारीरिक चाचणी पुरुष)

  • १६०० मीटर धावणे : ३० गुण

  • गोळाफेक : २० गुण

  • एकूण गुण : ५० गुण

  • ---------------------------

  • (शारीरिक चाचणी महिला)

  • ८०० मीटर धावणे : ३० गुण

  • गोळाफेक : २० गुण

  • एकूण गुण : ५० गुण

लेखी चाचणीतील विषय...

  • १) मराठी व्याकरण : यात उमेदवारांची मराठी भाषेच्या व्याकरणावरील पकड तपासली जाते. यामध्ये शब्दांच्या जाती, वाक्यरचना, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा समावेश असतो.

  • २) सामान्य ज्ञान : यात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी आणि विज्ञान यांसारख्या विषयांवरील प्रश्न विचारले जातात.

  • ३) बुद्धिमत्ता चाचणी : यात उमेदवारांची तर्कशक्ती, आकलन क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाते. यात संख्या मालिका, आकृतीबंध, नातेसंबंध आणि कोडी यांचा समावेश असतो.

  • ४) अंकगणित : यात उमेदवारांची मूलभूत गणितीय क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, गुणोत्तर आणि प्रमाण यांसारख्या संकल्पनांवरील ज्ञान तपासले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT