Sahittya Akadami 2023 
महाराष्ट्र बातम्या

Sahittya Akadami 2023 : 'स्वत:ला स्वत: विरुद्ध उभं करताना' ला युवा तर 'छंद देई आनंद' ला बालसाहित्य अकादमी पुरस्कार

यामध्ये विशाशा विश्वनाथ यांच्या स्वतला स्वताविरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहाला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

युगंधर ताजणे

Yuwa Sahitya Akadami Puraskar 2023 Vishakha Vishwanath : साहित्य क्षेत्रात मानाचे पुरस्कार समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्यामध्ये रुची असणाऱ्या आणि साहित्याची आवड असणाऱ्यांना या पुरस्काराची विशेष उत्सुकता असते. यंदाच्या वर्षी मराठी साहित्याक्षेत्रातूनही युवा आणि बाल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये विशाशा विश्वनाथ यांच्या स्वतला स्वताविरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहाला युवा साहित्य अकादमीनं गौरविण्यात आले आहे. तर एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद नावाच्या काव्यसंग्रहाला बालसाहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोशल मीडियावरुन या दोन्ही साहित्यकांवर कौतूकाचा वर्षाव होतो आहे.

गेल्या काही दिवसांपासून साहित्य क्षेत्रातील या प्रसिद्ध पुरस्कारांची चर्चा होती. त्यात संस्कृत, मैथिली आणि मणिपूरी भाषा वगळता सर्वच भाषांमधील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

देशपातळीवर ज्या पुरस्कारांचा गौरव केला जातो आणि ज्या पुरस्कारांची साहित्यिक,समीक्षक, वाचक आतूरतेनं वाट पाहत असतात अशा साहित्य पुरस्कारांची घोषणा होताच साहित्य वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हिंदीमध्ये अतुल कुमार यांच्या चांदपूर की चंद्राला तर इंग्रजीमध्ये अनिरुद्ध कानिसेट्टी यांच्या लॉर्डस ऑफ द डेक्कन- सदर्न इंडिया फ्रॉम द चालुक्याज टू ज चोलाज या पुस्तकाला पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.

याशिवाय पंजाबी साहित्यामध्ये संदीप यांच्या चित्त दा जुगराफिया यांच्या तर उर्दूमध्ये तौसिफ बरेलवी यांच्या जहन जाह या कथासंग्रहाला पुरस्कार जाहिर झाला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कार्यकारी मंडळानं या युवा पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात २० युवा लेखकांची निवड करण्यात आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी ओडिसी भाषेतील पुरस्कारांची निवड करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manmad News : मनमाड कृषी बाजार समितीतील अविश्वास ठराव फेटाळला; दीपक गोगड यांना दिलासा

Pimpri-Chinchwad Update : सायकल चालवा; कोंडी फोडा, प्रदूषण हटवा! ‘स्मार्ट सिटी’त पालिकेकडून ‘स्टार्ट अप’ने मुहूर्तमेढ

Punawale Traffic Jam : ‘एमएनजीएल’ वाहिनी फुटून वायुगळती, हजारो ग्राहकांना फटका; पुनावळे भुयारी मार्गाजवळ तीन तास कोंडी

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयांऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

PMC News : पांडवनगरमधील दीड हजार रहिवासी धोक्यात; महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत झाडं घरात!

SCROLL FOR NEXT