Baba Siddique  esakal
महाराष्ट्र बातम्या

Baba Siddique : वडिलांचा काँग्रेसला रामराम, आता झीशान काय करणार? बाबा सिद्दीकींनी स्पष्टच सांगितलं...

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागच्या ४८ वर्षांपासून ते पक्षाशी एकनिष्ठ होते. चारवेळा राज्यमंत्री आणि तीन वेळा आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता आहे.

संतोष कानडे

मुंबईः काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागच्या ४८ वर्षांपासून ते पक्षाशी एकनिष्ठ होते. चारवेळा राज्यमंत्री आणि तीन वेळा आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता आहे.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी राजीनामा दिला त्याला काही कारणं आहेत. परंतु अशाकाही गोष्टी असतात त्यावर काही बोलता येत नाही. काहीतरी झालंच असेल त्यामुळे मी पक्ष सोडून बाहेर पडतोय.

सिद्दीकी पुढे म्हणाले की, मी ज्यांच्याकडे प्रवेश घेणार आहे त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन सगळं सविस्तर बोलेन. मी एक छोटा माणूस आहे. माझ्यासोबत काही जिल्हा परिषद सदस्य आणि काही नगरसेवक येतील. १० तारखेला आमची सभा होणार असून पुढे काय काय होईल, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झीशान सिद्दीकी हेसुद्धा काँग्रेसला रामराम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर बाबा सिद्दीकींनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले की, झीशान सिद्दीकी हे स्वतंत्र आहेत. ते स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा.

''माझा काँग्रेसमधील प्रवास हा इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंतचा आहे. खर्गेजी माझ्या वडिलांसारखे आहेत. पक्ष सोडला असला तरी काही नाती अशी असतात ती तुटत नाहीत.'' असंही शेवटी बाबा सिद्दीकी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT