Washim ZP School 
महाराष्ट्र बातम्या

ZP School : सरकारी शाळाच भारी! एकमेव विद्यार्थ्यासाठी रोज भरतो वर्ग, मिळतात सगळ्या सोयीसुविधा

सरकारी शाळांचा दर्जा खालावल्याचं कारण सांगत पालक कायम नाक मुरडताना दिसतात. तर दुसरीकडं व्यावसायिक बनलेल्या खासगी शाळांसाठी भरमसाठ पैसा खर्च करत असतात.

सकाळ डिजिटल टीम

वाशीम : सरकारी शाळांचा दर्जा खालावल्याचं कारण सांगत पालक कायम नाक मुरडताना दिसतात. तर दुसरीकडं व्यावसायिक बनलेल्या खासगी शाळांसाठी भरमसाठ पैसा खर्च करत असतात.

पण सरकारी शाळाच का भारी असतात याचं एक चांगलं उदाहरण समोर आलं आहे. ही अशी आशी शाळा आहे जी केवळ एकाच विद्यार्थ्यासाठी भरते, विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला सरकारच्या सर्व सुविधाही मिळतात. (Zilla Parishad primary school in Ganeshpur village of Washim district runs only for one student)

एएनआयच्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील गणेशपुर या गावात ही शाळा आहे. या गावची लोकसंख्या १५० असून इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एकाच विद्यार्थ्यानं अॅडमिशन घेतलंय. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून एकाच विद्यार्थ्याचं अॅडमिशन असूनही त्याच्यासाठी ही शाळा दररोज भरते.

विद्यार्थ्याला मध्यान्ह भोजनंही मिळतं

विशेष म्हणजे, या शाळेत एकच शिक्षक आहेत. या शिक्षकाचं नाव किशोर मानकर असं असून ते या विद्यार्थ्याला सर्व विषय शिकवतात. या विद्यार्थ्याला सरकारच्या सर्व सुविधा मिळतात ज्यामध्ये मिड-डे मिल अर्थात मध्यान्ह भोजनाचाही समावेश आहे.

हे ही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

शाळेत राष्ट्रगीतही होतं

सकाळी १०.३० ते १२.०० वाजेपर्यंत ही शाळा भरते. या शाळेत सर्व नियमांच पालन केलं जातं. यामध्ये शाळेची सुरुवात राष्ट्रगीतानं होते, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या सर्व सुविधाही दिल्या जात आहेत. या विद्यार्थ्याला मी स्वतः सर्व विषय शिकवतो, असं शिक्षण किशोर मानकर यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT