sangola, shelakewadi zp school

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सांगोल्यातील ‘शेळकेवाडी’ची झेडपी शाळा देशात नंबर वन! ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार, पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान; काय आहे शाळेचे वैशिष्ट्य, वाचा...

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय मानांकन’ स्पर्धेत सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. ९०.८० गुणांसह ‘फाईव्ह स्टार’ मानांकन प्राप्त करत शाळेने देशातील १९१ उत्कृष्ट शाळांमध्ये ६३वा क्रमांक पटकावला आहे. हा बहुमान मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठरली आहे.

तात्या लांडगे

महूद : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय मानांकन’ स्पर्धेत सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. ९०.८० गुणांसह ‘फाईव्ह स्टार’ मानांकन प्राप्त करत शाळेने देशातील १९१ उत्कृष्ट शाळांमध्ये ६३वा क्रमांक पटकावला आहे. हा बहुमान मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठरली आहे.

शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आगामी काही दिवसांत नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने अत्यंत कडक निकषांवर हे मूल्यांकन केले. शाळांनी ६० प्रश्नांचे स्वयंमूल्यांकन सादर केले होते. जल व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा संवर्धन, हरित परिसर आणि विद्यार्थी सहभाग या सहा निकषांवर शाळेचे मूल्यमापन झाले. शेळकेवाडी शाळेने शुद्ध पिण्याचे पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छ व स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्लास्टिकमुक्त परिसर, कंपोस्ट खत निर्मिती, सौरऊर्जेचा वापर, वृक्षसंवर्धन, परसबाग तसेच इको क्लब आणि पर्यावरण क्लबच्या माध्यमातून विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवून हे यश संपादन केले.

शंभर टक्के उपस्थिती, आरोग्यदायी वातावरण

परसबाग व तेथील भाजीपाल्याची विद्यार्थ्यांकडून विक्री, भिंतींवर आकर्षक रंगरांगोटी, स्वच्छता, संगणक लॅब, कृतीतून शिक्षण, खेळाला महत्त्व, छोटे ग्रंथालय, एलईडी स्क्रिन, वर्गात पंखे, दरवर्षी शैक्षणिक सहल, महापुरुषांच्या जिवनचरित्रांचे वाचन असे उपक्रम त्याठिकाणी होतात. त्यातून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली. स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झाला आहे. शाळेत स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजल्या असून, शाळेची उपस्थिती शंभर टक्क्यांपर्यंत पोचली आहे.

यशामागे शिक्षक, ग्रामस्थांची टीमवर्क

या राष्ट्रीय यशामागे मुख्याध्यापक मच्छिंद्र भाटेकर आणि सहशिक्षिका शीतल पोळ यांचे नियोजनबद्ध कार्य मोलाचे ठरले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास वाघमोडे, उपाध्यक्ष समाधान भाटेकर, सरपंच दादासाहेब घाडगे, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचेही या यशात मोठे योगदान आहे.

यापूर्वीही पुरस्कारांची परंपरा

  • २०२३-२४ : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तालुक्यात प्रथम

  • २०२४-२५ : पुणे विभागात द्वितीय क्रमांक

  • २०२५-२६ : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा निकाल प्रतीक्षेत

  • २०२६ : राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय’ फाईव्ह स्टार मानांकन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT