schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळांमधील ५०५ शिक्षक ‘डेंजर झोन’मध्ये! जिल्ह्यातील १५,१६९ विद्यार्थ्यांकडे 'आधार'च नाही

शाळांच्या संचमान्यतेसाठी आता आधारकार्ड असलेले विद्यार्थीच गृहीत धरले जाणार आहेत. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना १५ दिवसांत तब्बल १५ हजार १६९ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून घ्यावे लागणार आहे. नाहीतर जिल्ह्यातील ५०५ शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात.

तात्या लांडगे

सोलापूर : शाळांच्या संचमान्यतेसाठी आता आधारकार्ड असलेले विद्यार्थीच गृहीत धरले जाणार आहेत. जेवढे आधारकार्ड नसतील, तेवढे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना (पहिली ते बारावी) १५ दिवसांत तब्बल १५ हजार १६९ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून घ्यावे लागणार आहे. नाहीतर जिल्ह्यातील ५०५ शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात, असा इशारा प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून माध्यमिकच्या एक हजार ६३ शाळा आहेत. खासगी प्राथमिकच्या देखील काही शाळा आहेत. या शाळांमध्ये साडेपाच लाखांवर विद्यार्थी आहेत. परंतु, आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यतेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार नोंदणी बंधनकारक आहे. चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या ‘आधार’मध्ये त्रुटी आहेत. त्यातील १५ हजार १६९ विद्यार्थ्यांचे आधारकार्डच नाही.

दुसरीकडे सव्वालाख विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये लिंग, नाव, जन्मतारीखेत त्रुटी आहेत. ३० एप्रिलपर्यंत आधारकार्ड देखील काढून घ्यावे लागणार आहे आणि त्रुटींची पूर्तता देखील करून घ्यावी लागणार आहे. मे महिन्यात सर्वच शाळांची संचमान्यता होणार आहे. त्यावेळी जेवढे आधारकार्ड नसलेले विद्यार्थी असतील, ते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे तेवढे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.

मुलांची ‘आधार’ची स्थिती (इयत्ता १ ते १२)

  • एका शिक्षकासाठी विद्यार्थी

  • ३०

  • मुलांचे ‘आधार’च नाही

  • १५,१६९

  • ‘अतिरिक्त’ची भीती

  • ५०५

  • आधार प्रमाणीकरणाची मुदत

  • ३० एप्रिल

नऊ हजारांवर विद्यार्थ्यांचे लिंग, जन्मतारीख चुकली

जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांमधील सहा हजार १४७ विद्यार्थ्यांकडे अजूनही आधारकार्डच नाही. तर ३० हजार विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये त्रुटी आहेत. त्यात नाव, जन्मतारीख, लिंग, जन्मतारीख व लिंग, नाव व जन्मतारीख आणि नाव व लिंगात बदल झालेला आहे. खासगी प्राथमिक शाळांमधील (पहिली ते आठवी) सहा हजार ४३२ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शाळांमध्ये नोंदवलेलेच नाही. तर नववी ते बारावीच्या वर्गातील दोन हजार ५९० विद्यार्थी आधाराविनाच आहेत. ३० एप्रिलपर्यंत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून त्याची ‘सरल’ पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

संचमान्येपूर्वी आधार बंधनकारकच

झेडपी शाळांबरोबरच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा-महाविद्यालयांमधील एकूण १५ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदवलेले नाही. दुसरीकडे मिसमॅच असलेले देखील विद्यार्थी लाखांवर आहेत. दोन्हीची पूर्तता ३० एप्रिलपर्यंत करावे लागणार आहे. सीईओ दिलीप स्वामी यांनी मुख्याध्यापकांना त्यासंदर्भात वेळावेळी मार्गदर्शन केले आहे. पंचायत समित्यांसह महिला व बालकल्याण विभागाकडील आधार केंद्रांवरून शाळांनी आधारकार्ड काढणे व त्रुटींची दुरुस्ती करून घ्यावी.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT