महाराष्ट्र बातम्या

आशाताईंना सेनेत न्याय मिळाला नाही, भाजप देईल - चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

पुणे जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानं शिवसेनेला धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे.

पुणे - जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानं शिवसेनेला धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. आशाताई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितित जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले की, गेले अनेक दिवस आम्ही या प्रवेशाची प्रतिक्षा करत होतो. महिला असूनही मुंबईत प्रस्थापित असतानाही आपल्या मूळ गावी गेल्या. तिथे ४ वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. आशाताईंना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय आणि सन्मानही दिला जाईल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

आशाताई या तीनवेळा जुन्नरमधून आमदारकीची निवडणूक लढल्या, मात्र त्यांना यश मिळाले नाही. पण येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आमदार म्हणून बघायचं आहे असे चंद्रकात पाटील म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता आम्हाला १०० टक्के विश्वास आहे २०२४ साली जुन्नरचा आमदार भाजपचा असेल आणि त्या आशाताई बुचके असतील.

काय म्हणाले फडणवीस

- राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्याने भाजपला ही संधी आहे

- जसा तुमचा श्वास कोंडत होता तसा आमचाही काही ठिकाणी श्वास कोंडत होता

- आता तीन पक्ष एकत्र आलेत आता श्वास त्यांचा कोंडतोय

- युती असल्याने तेव्हा पक्ष वाढीसाठी काही मर्यादा होत्या

- पण आता मोकळा श्वास घेतोय

- २०२४ साली भाजप स्वबळावर सत्तेत येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 25,100च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा एक शिलेदार गेला, त्यांनी दोन गळाला लावले; गोकुळच्या माजी अध्यक्षांसह एका नगराध्यक्षाचाही प्रवेश निश्चीत

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Marathwada Farmer : नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; मराठवाडा पुन्हा अश्रूंमध्ये भिजला, सरकार वेळीच दखल घेणार का?

Viral News: साहेब मला वाचवा ! बायको रात्री नागिन बनते अन्... घाबरलेल्या नवऱ्याच्या विनंतीने अधिकाऱ्यासह सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT