ATS officers in Solapur for investigations to Juber Hungergekar.

 

Sakal

महाराष्ट्र बातम्या

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने जुबेरला पुण्यातून अटक केली होती. त्याअनुषंगाने आता ‘एटीएस’ने कार्यक्रमाचे आयोजक ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’ संघटनेच्या मजहर नामक पदाधिकाऱ्यास नोटीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : वळसंग पोलिसांच्या हद्दीतील कुंभारीजवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १६ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २० ऑक्टोबर रोजी कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी जुबेर हंगरगेकर प्रमुख पाहुणा होता. पुढील चार-पाच दिवसांतच दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने जुबेरला पुण्यातून अटक केली होती. त्याअनुषंगाने आता ‘एटीएस’ने कार्यक्रमाचे आयोजक ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’ संघटनेच्या मजहर नामक पदाधिकाऱ्यास नोटीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘एटीएस’च्या कारवाईत जुबेरकडील मोबाईल, लॅपटॉपमध्ये ‘अल कायदा’ संघटनेशी संबंधित बरेच महत्त्वाचे पुरावे, माहिती हाती लागले आहे. या प्रकरणात मूळचा सोलापूर शहरात राहणारा जुबेर अटकेत आहे. उद्या (ता. ४) त्याची पोलिस कोठडी संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयात नेले जाईल. दरम्यान, सोलापुरातील ज्या संस्था व शाळेच्या संयुक्त विद्यमाने तो कार्यक्रम झाला, त्या सर्वांकडे चौकशी सुरू आहे. याशिवाय कार्यक्रमास उपस्थितांकडेही माहिती पोलिस घेत आहेत.

तसेच वाहदते मुस्लिम- ए- हिंद संघटनेच्या सोलापुरातील प्रमुखाची (कार्यक्रमाचा मुख्य आयोजक) ‘एटीएस’कडून चौकशी होईल. जुबेर त्या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात सतत होता, असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या अनुषंगाने ‘एटीएस’ने सोलापुरातील एका शाळेतील शिक्षक व त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना सोडूनही देण्यात आले. आता कार्यक्रमाच्या आयोजकांकडे व शाळेच्या पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांकडेही चौकशी होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

विद्यार्थी म्हणाले, कार्यक्रमात दिली कुराण, एआय विषयांवर माहिती

कुंभारी हद्दीतील शाळेतील विद्यार्थ्यांना (१६ ते १८ वयोगट) जुबेरने करिअर मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात आले. तो कार्यक्रम वाहदते मुस्लिम- ए- हिंद या संघटनेने आयोजित केला होता. या कार्यक्रमात तीन दिवसांत जुबेरने विद्यार्थ्यांना कुराण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासह अन्य विषयांवर मार्गदर्शन केल्याचे विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेण्यामागील संस्थेचा नेमका हेतू काय होता, जुबेरला प्रमुख पाहुणे म्हणून का बोलावले, या बाबींची चौकशी ‘एटीएस’कडून सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

अरे वाह! 'पारु' मालिकेनंतर प्रसाद जवादेला मिळाली नवी मालिका, पूर्वा कौशिकसोबत नवी जोडी, प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

SCROLL FOR NEXT