Gondia esakal
Nagpur_old

Gondia: कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई; अनेक त्रुट्या आढळल्याने जिल्ह्यातील ४३ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

सकाळ डिजिटल टीम

गोंदिया: नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे यासह अन्य त्रुट्या आढळून आल्याने जिल्ह्यातील ४३ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बि-बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकांमार्फत अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे.

कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिष्टर न ठेवणे.

रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, मुदतबाह्य कीटकनाशक साठा विक्रीसाठी ठेवणे आदी कारणांमुळे ४३ निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

त्यामध्ये गोंदिया-७, सडक अर्जुनी-२०, अर्जुनी मोरगाव-११, सालेकसा-३, गोरेगाव-२ (बियाणे-३, रासायनिक खते-३६, कीटकनाशक-४) आदींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिली.

शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी करावी, खरेदी करताना कृषी निविष्ठा केंद्राकडून निविष्ठा खरेदीचे पक्के बिले घ्यावे.

त्यावरील नमूद एमआरपीप्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपी पेक्षा जास्त दराने मालाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. त्याची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईल.

-हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT