mm 
मनोरंजन

'मिस यू मिस्टर'च्या ट्रेलरला मिळाले 1 मिलियन व्ह्यूज

सकाळ वृत्तसेवा

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी बहुचर्चित ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत ट्रेलरबरोबरच सिनेमाच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सिनेमामध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवं विवाहित जोडपं आहे असं दिसतंय आणि वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतंय, मग ते यातुन कसा मार्ग काढतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना २८ जूनला सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. हा संपूर्ण सिनेमा 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' वर भाष्य करणारा आहे, जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अश्या सर्वाना हा सिनेमा खूप उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही.

या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर,राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे.

‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही, पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,” ते म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT