Sufi Mehta(Son of T.V Star Nakuul Mehta-(Bade acche lagte hai) Google
मनोरंजन

ते जीवघेणे ७२ तास! वाचा या लहानग्या कोरोना योद्धाची भावस्पर्शी कहाणी!

टी.व्ही स्टार अभिनेता नकुल मेहताचा मुलगा सुफी कोरोनाबाधित झाला होता.

प्रणाली मोरे

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलाय. दिवसाला सर्व भारतभर रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. ओमायक्रॉन या नव्या विषाणूनं तिस-या लाटेची भीती निर्माण करण्यात कसर ठेवलेली नाही. आणि या कोरोनानं अगदी कोणालाही सोडलेलं नाही. कोरोनासाठी गरीब-श्रीमंत,सेलिब्रिटी-सर्वसामान्य असा भेदभाव नाही. त्याच्यासाठी सारे एकसमान. गेल्या काही दिवसात मनोरंजन क्षेत्रातल्या अनेकांना कोरोनानं गिळंकृत केलं तर अनेकांना आपला चटका सहन करण्यास भाग पाडलं. करिना कपूर,अर्जुन कपूर,अमृता अरोरा,नोरा फतेही,जॉन अब्राहम या आणि अशा अनेक सेलब्रिटींना कोरोनाची लागण झाली. यातनं हे सगळे बरे झाले खरे पण कोरोनाच्या त्रासावर त्यांनी लिहिलेल्या पोस्टही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या विसरून चालणार नाहीत. यामध्ये कुणा लहान मुलाला कोरोना झाल्याची बातमी नव्हती. लहान मुलांना कोरोनानं फारसं आपल्या विळख्यात घेतलं नव्हतं. पण आता हळूहळू बातम्या येऊ लागल्यात.

त्यातच 'बडे अच्छे लगते है' फेम नकुल मेहताच्या(Nakuul Mehta) केवळ अकरा महिन्याच्या मुलाला कोरोना झाल्याचीही बातमी समोर येतेय. नकुलची पत्नी जानकी पारेखनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं ही माहिती दिली. खरंतर दोन आठवड्यापूर्वी नकुलच्या अकरा महिन्याच्या मुलाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. नकुलची पत्नी जानकीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय,''रात्री अचानक ११ महिन्यांच्या आमच्या मुलाला ताप भरला. जो जवळ जवळ 104 डिग्रीपेक्षा थोडा जास्तच होता. आम्ही लगेचच त्याला इस्पितळात दाखल केलं. सगळ्या तपासण्या झाल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचं कळलं आणि पायाखालची जमीनच सरकली''.

Nakuul Mehta With his wife jankee Parekh And covid warrier Son Sufi

त्यानंतरचे आयसीयू मधले आमचे दिवस म्हणजे आई-वडिल म्हणून आमची परिक्षा घेणारे होते. सुफीनंतर नकुलही कोरोना पॉझिटिव्ह निघाला अनं मग माझं जग पुन्हा हादरलं. कोरोनानं जे दिवस आम्हाला दाखवले त्यातून अजुनही बाहेर येणं कठीण जातंय''. तिच्या या पोस्टवर टि.व्ही इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहे. नकुलनं त्याच्या पत्नीच्या त्या पोस्टवर आपल्या मुलासाठी कमेंट करताना म्हटलंय,''चॅम्पियन मेहता''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT