12th fail actor vikrant massey new movie the sabarmati report announcement  SAKAL
मनोरंजन

The Sabarmati Report: विक्रांत मेस्सीचा नवीन सिनेमा! '12th फेल'नंतर दिसणार या ज्वलंत सिनेमात

विक्रांत मेस्सीच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

The Sabarmati Report Vikrant Massey: २०२३ हे वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलं ते 12th फेल या सिनेमाने. 12th फेलच्या उत्तुंग यशानंतर विक्रांत मस्से पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. विक्रांत एका ज्वलंत विषयावरील आगामी सिनेमात अभिनय करणार आहे.

विक्रांत एकता कपूरच्या 'द साबरमती रिपोर्ट' नावाच्या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच एकता कपूरचं प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडने विक्रांत मस्सेची प्रमुख भूमिका असलेल्या या राजकीय थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

(12th fail actor vikrant massey new movie the sabarmati report announcement)

पॉलिटिकल थ्रिलर साबरमती रिपोर्ट

द साबरमती रिपोर्ट या चित्रपटात विक्रांत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात विक्रांतसोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले आहे. ज्यांनी यापूर्वी ग्रहण ही वेब सिरीज देखील दिग्दर्शित केली होती.

सत्य घटनेवर आधारित साबरमती रिपोर्ट

एकता कपूरच्या द साबरमती रिपोर्ट या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. 'द साबरमती रिपोर्ट' 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित आहे.

कंटेंट क्वीन एकता कपूरच्या नेतृत्वाखाली द साबरमती रिपोर्टची निर्मिती होत आहे.

द साबरमती रिपोर्टची उत्सुकता

'12th फेल' या सिनेमात विक्रांतची प्रमुख भूमिका होती. आता द साबरमती रिपोर्टमध्ये विक्रांतसोबत जवान फेम अभिनेत्री रिद्धी डोगरा आणि राशि खन्ना झळकणार आहेत.

३ मे २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT