aishwarya and salman khan
aishwarya and salman khan  Team esakal
मनोरंजन

त्यानंतर ते पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत...'हम दिल चूके' ची 22 वर्षे

युगंधर ताजणे

मुंबई - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित (sanjay leela bhansali) हम दिल चूके सनम (hum dil de chuke sanam) या चित्रपटाला नुकतीच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 जून 1999 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. अभिनेता सलमान खान (Salman and aishwarya) आणि ऐश्वर्या यांचा हा एकमेव असा चित्रपट होता. त्यानंतर ते दोघांनी एकत्रितपणे कुठल्याही चित्रपटात काम केलेलं नाही. त्यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला होता की, त्यांनी एकमेकांशी ब्रेक अप केले. आणि सलमान ऐश्वर्या बॉलीवूडमधील एक वेगळं प्रकरण म्हणून चर्चिले जाऊ लागलं. (22 years of hum dil de chuke sanam unseen pictures of ajay devgn aishwarya rai salman khan)

अजयनं (ajay devgn) आपल्या पोस्टमध्ये तीन फोटो शेयर केले आहेत. त्यात पहिल्या फोटोमध्ये तो संजय लीला भन्साळीसोंबत दिसतो आहे. दुस-या फोटोमध्ये सलमान बरोबर तर तिस-या फोटोमध्ये ऐश्वर्याबरोबर आहे. त्याचे ते तिन्ही फोटो कमालीचे सुंदर आहेत. त्याला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. यावेळी अजयनं त्यावेळच्या त्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अजयनं हम दिल दे चूके सनमला 22 वर्षे झाल्यानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांनी त्या पोस्टला पसंती दर्शवली आहे. त्यावेळी सलमान, अजय आणि ऐश्वर्या आम्हा सर्वांना माहिती होते की, संजय लीला भन्साळी एक संवेदनशील विषयावर चित्रपट तयार करत आहेत. मात्र आम्हाला त्यावेळी माहिती नव्हते की, हा चित्रपट एवढा यशस्वी होईल. हम दिल दे चूके सनमनं इतिहास घडवला होता.

भन्साळी यांचा हा चित्रपट गुजराती लेखक जवेरचंद मेघानी यांच्या शेतल ने काठे या नाटकावर आधारित होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. त्यावेळी या चित्रपटानं 51.4 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. तर चित्रपटाचे बजेट 16 कोटी रुपये एवढे होते. हम दिल दे चूके सनम हा परदेशातही यशस्वी झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT