25 year old TV actress sejal sharma commits suicide
25 year old TV actress sejal sharma commits suicide  
मनोरंजन

ग्लॅमर क्षेत्रातील आणखी एक बळी, डिप्रेशनमुळे अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या

वृत्तसंस्था

मुंबई : टीव्ही सिरिअल विश्वातील अभिनेत्री सेजल शर्मा हिचा वयाच्या 25 व्या वर्षी धक्कादायक मृत्यू झाला आहे. सेजलने मुंबईच्या राहत्या घरी आत्महत्या केल्य़ाची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (ता. 24 ) ला मुंबईच्य़ा मीरा रोड परिसरातील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुखद बातमी समोर आली आहे. त्यानंतर तिचा मृत्यू घरातच आढळला. 

पोलिसांना एक सुसाइटॉड नोटदेखील मिळाली आहे. ग्लॅमर क्षेत्रातील आणखी एक बळी गेल्याने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिस या सर्व घटनेचा तपास घेत आहेत. पण, तिच्या आत्महत्येचं कारण काय आहे हे जाणून घ्या. सेजलने तिच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, आयुष्य संपवण्य़ाच्या निर्णयाला कोणी व्यक्ती जबाबदार नाही. काशीमारा पोलिसांनी या घटनेची अॅक्सीडेंटल डेथ केस म्हणून दाखल केली आहे. सेजलचे मित्र-मैत्रीण आणि तिच्यासोबत राहणारे रुममेट यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

काम बंद झालं आणि...
टेलिव्हिजन वरील सुप्रसिद्ध मालिका 'दिल तो हॅप्पी है जी' मध्ये सेजल काम करत होती. मीरा रो़डच्या एका सोसायटीमध्ये ती भाड्याने राहत होती. मागच्या वर्षी 2019 च्या जानेवारीमध्ये तिचा हा शो सुरु झाला होता. पण, काही कारणामुळे हा शो अचानक ऑगस्टमध्ये बंद पडला. या मालिकेमध्ये ती 'सिम्मी' ची भूमिका साकारत होती. 
तिच्या आत्महत्येचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी मात्र सेजलच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणींमुळे तिने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 5 वाजता ती पंख्याल्या लटकलेल्या अवस्थेत होती. तिच्य़ा काही मित्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सेजल अनेक दिवस काम नसल्याने डिप्रेशनमध्ये अर्थात नैराश्याचा सामना करीत होती. तिचा शो अचानक बंद पडला होता आणि मधल्या काळामध्ये तिला दुसरे काम मिळत नव्हते. तिचा को-स्टार निर्भय शुक्लाने सांगितले की, तिच्या वडिलांच्या बिघडलेल्या तब्य़ेतीमुळेही ती खूप तणावात होती. शिवाय पोलिस या केसचा वेगळ्या अॅंगलने तपास करण्य़ाचाही प्रयत्न करत आहेत. कारण, सेजल एका रिलेशनशिपमध्येही होती. 

सेजल मुळ राजस्थानमधील उदयपुरची आहे. 2017 मध्ये ती मुंबईमध्ये आली होती आणि आतापर्यंत तीने एक सिरिअलमध्ये काम केलं होतं. याआधी ती आमिर खान, किक्रेटर हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा यांच्यासह कर्मशिअलमधून दिसली होती. 

कुशल पंजाबीची घटना ताजी असतानाच दुसरा धक्कादायक प्रकार
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 27 डिसेंबरला टीव्ही सिरिअल विश्वातील प्रसिद्ध चेहरा असलेल्या कुशल पंजाबी याचा 37 व्या वर्षी आत्महत्या केली. कुशलने अखेरचं काम इश्क में मरजावां या सिरिअलमध्ये काम केलं होतं. त्याने एका युरोपियन मुलीशी लग्न केल असून त्याला 2016मध्ये एक मुलगाही झाला आहे. त्याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, सलाम ए इश्क अशा अनेक फेमस चित्रपटांत काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT