vijay kondke, vijay kondke news, maherchi sadi full movie, lek asavi tar ashi  SAKAL
मनोरंजन

Vijay Kondke: 'माहेरची साडी' नंतर ३० वर्षांनी निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांच्या नवीन सिनेमाचा मुहूर्त..

माहेरची साडी नंतर तब्बल ३० वर्षांनी विजय कोंडके यांचा सिनेमा पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत

Devendra Jadhav

Vijay Konkde New Movie Lek Asavi Tar Ashi News: १९९१ च्या दशकात सुपरहीट ठरलेल्या 'माहेरची साडी' चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३० वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या चित्रपटाची घोषणा केली.

विजय कोंडके यांच्या 'ज्योती पिक्चर्स' निर्मित 'लेक असावी तर अशी' असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ इंगवली (ता.भोर) येथील कोंडके फार्मवर शनिवारी (ता.१५) करण्यात आला.

(30 years after 'Maherchi Sari', producer-director Vijay Kondke's new movie is coming )

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार यतीन कार्येकर, शुभांगी गोखले, प्राजक्ता हणमघर, या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत असलेली गायत्री दातार आणि दादसाहेब पासलकर यांच्यासह चित्रपटातील सहकलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

अवधूत गुप्ते, वैशाली सामंत या प्रमुख गायकांसह इतरही नवीन गायकांनी गाणी गायली आहेत. विजय कोंडके आणि मंगेश कांगणे यांनी गीते लिहीली आहेत.

या चित्रपटात यतीन कार्येकर, शुभांगी गोखले, प्राजक्त हणमघर व गायत्री दातार यांच्यासमवेत ओंकार भोजने, सविता मालपेकर, सुरेखी कुड़ची, सोमेश सावंत, अभिजित चव्हाण, नयना आपटे हेही कलाकार आहेत.

नोव्हेंबर महिन्याअखेरीज हा चित्रपट प्रदर्शीत केला जाणार असल्याचे विजय कोंडके यांनी सांगितले.

चित्रपटाची कथा ही सर्वसामान्या कुटुंबातील असल्यामुळे प्रेक्षकांना रडायला आणि हसायला लावणारा हा चित्रपट आहे.

अनंतराव थोपटे यांचा हात हा माझ्यासाठी लक्ष्मीचा हात असल्यामुळे त्यांच्या हस्ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

असल्याचे विजय कोंडके यांनी सांगितले. त्यामुळे माहेरची साडी नंतर तब्बल ३० वर्षांनी विजय कोंडके यांचा सिनेमा पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT