juhi chawala  Team esakal
मनोरंजन

'5 जी च्या विरोधात नाही, आम्हाला फक्त सेफ्टी सर्टिफिकेट द्यावं' ....

मी 5 जी च्या विरोधात नाही....

युगंधर ताजणे

मुंबई - देशात 5 जी नेटवर्क (5 g network) सुरु होणार असे कळताच बॉलीवूडची (bollywood actress juhi chawala) प्रसिध्द अभिनेत्री जुहीनं न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टानं तिला केवळ हे प्रसिध्दीसाठी करत असलेले प्रकार आहेत असेही म्हटले होते. आता जुहीनं तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिनं न्यायालयाला असं आवाहन केलं आहे की, मी 5 जी च्या विरोधात नाही. मात्र आम्हाला सुरक्षेचे सर्टिफिकेट द्यावे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (5g case juhi chawla new video not against 5g just give us the certificate of security)

गेल्या आठवड्यात जुहीनं 5 जी रेडिएशनच्या (court filed case) विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यावर कोर्टानं तिला हे केवळ प्रसिध्दीसाठी केलेले स्टंट (publicity stunt) होते का असाही प्रश्न विचारला होता. तसेच कोर्टाच्या सुनावणीचे व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं कोर्टानं तिला 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यावर जुहीनं पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं 5 जी ला विरोध नाही. तर मग आम्हाला सरकारनं सुरक्षेची हमी द्यावी. असं म्हटलं आहे.

जुहीनं म्हटलं आहे, गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर मोठा वाद झाला आहे. त्यातून मला जे काही सांगायचे होते ते हरवले आहे. मी काही 5 जी च्या विरोधात नाहीये. मला फक्त सुरक्षेचा प्रश्न मांडायचा होता. जो मी मांडला. जे कोणी 5 जी च्या नेटवर्कचे काम करणार आहेत. त्यांनी सर्वांच्या सुरक्षेची हमी द्यावी. अशी विनंती मला त्यांना करायची आहे. त्यासाठी त्यांनी आम्हाला सेफ्टी सर्टिफिकेट द्यावे.

कारण 5 जी नेटवर्क हे लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी घातक आहे. त्यांनाही सेफ्टी सर्टिफिकेट द्यावे. जुहीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक मिनिटांचा व्हि़डिओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते, गेल्या काही दिवसांपूर्वी जो काही वाद झाला त्यामुळे मी माझा आवाजही व्यवस्थित ऐकु शकलेले नाही. मी आगामी काळात भारतात येणा-या 5 जी नेटवर्कचे स्वागतच करते. मात्र मला एवढेच सांगायचे आहे, संबंधित यंत्रणेनं आम्हाला सुरक्षित आरोग्याचे सर्टिफिकेट द्यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

हरिहरेश्वर मंदिरात रक्तरंजित थरार! आईने पोटच्या मुलीवर केला धारदार शस्त्राने वार; स्वतःला संपवून घेण्याचाही प्रयत्न

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कृषी मेळावा

SCROLL FOR NEXT