69th National Awards Celebrities at 69th National Film Awards ceremony  Esakal
मनोरंजन

69th National Awards: अल्लू अर्जुन-क्रिती सेनेनसह 'या' कलाकारांचा झाला सन्मान! काय होती कलाकारांची प्रतिक्रिया

आलिया भट्ट-क्रिती सेनेनसह 'या' कलाकारांनी जिंकले राष्ट्रीय पुरस्कार, पहा संपुर्ण यादी

Vaishali Patil

National Film Awards 2023: नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. मंगळवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार अल्लू अर्जुनला देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट आणि क्रिती सॅनन यांना प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार दिग्दर्शक आर माधवनला देण्यात आला. यावेळी 'गोदावरी'चे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनाही दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी RRR या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. यावेळी दिग्दर्शक एसएस राजामौली उपस्थीत होते तर पंकज त्रिपाठींना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता-दिग्दर्शक रक्षित शेट्टीच्या 777 चार्ली या चित्रपटाला कन्नडमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार देण्यात आला.

अभिनेत्री पल्लवी जोशीला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिला 'इरावीन निऱ्हाळ' चित्रपटातील 'मायावा चयावा ' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार देण्यात आला.

चित्रपट निर्माते शील कुमार यांना 'सरदार उधम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हे पुरस्कार प्रदान केल्यानंतर सर्व कलाकारांचे अभिनंदन केले. एकत्र फोटो आणि सेल्फी काढले. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी फोटोत अल्लू अर्जुन आणि क्रिती सेनन पुष्पा चित्रपटाची पोझ देत सेल्फी घेताना दिसले, तर रणबीर कपूर आलिया भट्ट यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर एका व्हिडिओत आलिया आणि अल्लू अर्जुन भेटताना दिसले तर रणबीरनं देखील अल्लूची भेट घेतली.

या सोहळ्याचा फोटो शेयर करताना किर्तीनं लिहिलं की, "मनातील भावना शब्दात मांडणे सोपं नाही. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवसांपैकी एक असेल! नुपूर सनेन तुझी खुप आठवण आली." या फोटोसोबतच क्रितीने राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारतानाचा तिचा फोटो आणि व्हिडीओही शेअर केला आहे आणि लिहिले आहे - 'मोठा क्षण, दिनो आणि लक्ष्मण उतेकर तुझी खूप आठवण आली."

तर अल्लूनं देखील फोटो शेयर करत लिहिले, "राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा सन्मान मिळाला. या पुरस्काराबद्दल मला ज्युरी, मंत्रालय, भारत सरकार यांचे आभार मानायचे आहेत. हा पुरस्कार केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नाही, तर आमच्या सिनेमाला पाठिंबा देणाऱ्या आणि जपणाऱ्या सर्व लोकांचा आहे."

तर राजामौली यांनी सांगितलं की, "मी एक चित्रपट निर्माता आहे जो प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो आणि हे माझे पहिले उद्दिष्ट आहे. पुरस्कार हे बोनससारखे असतात पण जेव्हा तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT