anurag taapsee
anurag taapsee  
मनोरंजन

Income Tax Raid : सात बँक लॉकर्स जप्त, ईमेल्सची तपासणी.. वाचा धाडसत्रातील १० महत्त्वाचे मुद्दे

स्वाती वेमूल

अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची आयकर विभागाकडून अद्याप चौकशी सुरूच आहे. कर बुडवल्याप्रकरणी हे धाडसत्र सुरू असून अद्याप याप्रकरणी काय काय घडलं ते जाणून घेऊयात..

१- बुधवारी तापसी, अनुराग आणि 'फँटम फिल्म्स' या कंपनीच्या सहमालकांच्या घरावर व कार्यालयार आयकर विभागाने धाडी टाकल्या. बुधवारपासून हे धाडसत्र अद्याप सुरूच आहे. 

२- मुंबई आणि पुण्यातील २८ ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. सेलिब्रिटींचं काम करणारे काही अधिकारी आणि क्वान (KWAN) आणि एक्सिड या टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. 

३- व्हॉट्सअ‍ॅप चॅट, ईमेल्स, कागदपत्रे आणि कम्प्युटर्स जप्त करण्यात आले आहेत. तापसी आणि अनुराग यांना पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमधून आता पिंपरी चिंचवडमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. 

४- दोन चित्रपट कंपन्या, दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि अभिनेत्रीच्या घरी छापे टाकून ६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आणली असल्याचा दावा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला. 

५- जवळपास ३०० कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेबाबत कोणतेही स्पष्टीकरण प्रॉडक्शन हाऊसचे कर्मचारी देऊ शकले नाहीत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

६- तापसी पन्नूच्या नावाने पाच कोटी रुपयांची कॅश रिसीटही सापडली असून त्याबद्दलचा तपास सुरू आहे. त्याचसोबत ३५० कोटींची करचोरी झाल्याचेही पुरावे सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले. 

७- आमचे सरकार असताना जेव्हा अशा प्रकारची कारवाई होते, तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, २०१३ मध्ये जेव्हा कलाकारांवर कारवाई झाली, तेव्हा कुणीही काही विचारलं नव्हतं, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण या धाडसत्राबाबत म्हणाल्या. 

८-  'फँटम कंपनी'ने केलेल्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांची तपासणी आयकर विभागाकडून होत आहे. त्याचप्रमाणे या छाप्यांमधून कर बुडवल्याच्या पुराव्यांची शोधाशोध करण्यात आली, अशीही माहिती समोर येत आहे. 

९- तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्यासोबतच फँटम फिल्म्सचे माजी प्रवर्तक विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. 

१०- जे लोक केंद्र सरकारच्या धोरणांबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, त्याच लोकांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या जात आहेत, असं वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हान यांनी केलं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT