72 Hoorain Trailer  Esakal
मनोरंजन

72 Hoorain Trailer: जिहादी होऊन मेले पण 72 हूरें काही भेटेना? सेन्सॉर बोर्डाच्या बंदीनंतरही काळजाचा धरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज

Vaishali Patil

72 Hoorain Trailer Release: मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसापासून '72 हूरें' या चित्रपटाची चर्चा होती. त्यातच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला मान्यता दिली नाही.

CBFC च्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य या मुद्द्यांवर वाद सुरू झाला आहे. आता चित्रपटाचे निर्माते सीबीएफसीच्या निर्णयाविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. या वादादरम्यानच आता निर्मात्यांनी आता '72 Hoorain' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी दुसऱ्याच दिवशी डिजिटल पद्धतिने चित्रपटाचा ट्रेलर रिलिज केला. मात्र, त्याच्या मंजुरीशिवाय हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करता येणार नाही.

काळजाचा धरकाप उडवणारा हा टिझर विचार करण्यास भाग पाडतोय. ट्रेलरच्या सुरुवातीलाच '72 हूरें'चा उल्लेख आहे. एक दाढीवाला व्यक्ती 72 हूरें बद्दल तेथे बसलेल्या लोकांना माहिती सांगत आहे. तो त्याच्या भाषणाने लोकांना प्रभावित करत असतो. त्यानंतर ते लोक जिहादी झाल्याचं दिसत.

गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या बॉम्बस्फोटाची झलक या ट्रेलरमध्ये दिसते जी पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. यात अनेक दहशतवादी हल्ला आणि घातपाताची घटना दाखवल्या आहे. ज्यात दोन व्यक्ती मेल्यानंतर '72 Hoorain'ची प्रतिक्षा करतांना दिसतायं.

शेवटी त्यांना कळते की तेव्हा त्यांना कळतं की मौलवीने हूरें बद्दल सांगतलेल्या गोष्टी खोट्या आहेत.

दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे संजय पूरण सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर किरण डागर, गुलाब सिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तसेच अशोक पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट 7 जुलै रोजी प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT