72 Hooren Movie controversy Teaser the kerala esakal
मनोरंजन

72 Hoorain Teaser: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतांना आता मराठीतही येणार '72 हुरे'! आणखी...

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात मनोरंजन कमी आणि वाद जास्त होतांना दिसत आहे. मग तो चित्रपटांमुळे असो किंवा कलाकरांच्या वागण्यामुळे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द केरळ स्टोरीमुळे तर वातावरण आणखीच बिघडलं. काहींनी या चित्रपटाला पाठिंबा दिला तर काहींनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला. आता त्यातच आणखी एका चित्रपटाने एंट्री केली आहे. त्याच नाव आहे '72 हुरें'

या चित्रपटाची बरीच चर्चा झाली आहे. चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून अनेकांनी या चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कडाडून विरोध होत असतांनाच या लोकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सोशल मिडियावर या चित्रपटाची चर्चा होऊ लागली. द्वेष आणि वाढत्या विरोधादरम्यानच निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित आणखी एक नवीन घोषणा केली आहे.

काही दिवसांपुर्वी '72 हुरें' या चित्रपट टिझर रिलिज झाला होता. मात्र तो फक्त हिंदीत होता. मात्र आता निर्मात्यांनी टीझर आणखी 10 भाषांमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधित संजय पूरण सिंग यांनी एक पोस्ट शेयर केली आहे.

हा टीझर इंग्रजी, मराठी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, काश्मिरी आणि आसामी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्याची झलक त्यांनी या पोस्टमध्ये टाकले आहे.

दिग्दर्शक संजय पूरण सिंग यांनी चित्रपटाचा टिझर10 भाषांमध्ये रिलीज करण्यामागचं कारणही सांगितलं आहे.

'भारताच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या विषयाचे गांभीर्य कळावे यासाठी आम्ही हा चित्रपट 10 भाषेत रिलिज करत आहोत.'

कुणालाही दुखावण्याचा आमचा प्रयत्न नाही . देशात घडत असलेल्या हृदयद्रावक वास्तवाची लोकांना जाणीव करून देण्याचा त्यांचा उद्देश असल्याच त्यांनी सांगितलं आहे.

ओसामा बिल नादेन, अजमल कसाब, याकूब मेनन, मसूद अझहर, हाफिज सईद, सादिक सईद, बिलाल अहमद आणि हकीम अली यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांची नावं या टिझरमध्ये समाविष्ट केली आहेत. त्याची झलकही या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT