Vyjayanthimala esakal
मनोरंजन

Vyjayanthimala: वय हा केवळ आकडा! 90 व्या वर्षी वैजयंतीमाला यांचा अयोध्येत खास परफॉर्मन्स

Vyjayanthimala: 90 वर्षाच्या वैजयंतीमाला यांनी अयोध्येत (Ayodhya) नृत्यसादरीकरण केलं आहे.

priyanka kulkarni

Vyjayanthimala: बॉलिवूडमधील ज्येष्ठ वैजयंतीमाला (Vyjayanthimala) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं वैजयंतीमाला यांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. वैजयंतीमाला या सध्या त्यांच्या एका परफॉर्मन्समुळे चर्चेत आहे. 90 वर्षाच्या वैजयंतीमाला यांनी अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरासमोर (Ram Mandir) नृत्यसादरीकरण केलं आहे. त्यांच्या या परफॉर्मन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

वैजयंतीमाला यांचे नृत्यसादरीकरण

वयाच्या 90 व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली.अयोध्येतील राम मंदिरात सुरू असलेल्या 'रागसेवा' कार्यक्रमात वैजयंतीमाला यांनी आपली नृत्यशैली सादर केली. वैजयंतीमाला यांचा राम मंदिरातील नृत्यसादरीकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मालिनी अवस्थी यांनी शेअर केला व्हिडीओ

गायिका मालिनी अवस्थी यांनी वैजयंतीमाला यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "आपल्या देशात कला हे भक्तीचे सर्वोच्च स्थान मानले जाते, वैजयंतीमालाजींकडे पाहता ही गोष्ट लक्षात येते. वयाच्या नव्वदव्या वर्षी रामलालांच्या राग सेवेसाठी काल अयोध्येत आलेल्या वैजयंतीमालाजींना पाहून मला हे लक्षात आले की, हाच भारतीय कलेचा आध्यात्मिक आनंद आहे, मोक्षाची साधना आहे, ही साधना दीर्घायुषी होवो"

वैजयंतीमाला यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "आश्चर्यकारक, निःशब्द आणि अविस्मरणीय"

पाहा व्हिडीओ

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित वैजयंतीमाला भरतनाट्यममध्ये निपुण आहेत. वैजयंतीमाला गेल्या 54 वर्षांपासून अभिनय आणि चित्रपट जगतापासून दूर आहेत. 1970 मध्ये 'गंवार' चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीला अलविदा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT