Salman Khan, Vicky Kaushal Google
मनोरंजन

'सलमानसारखं बनू नकोस',या ट्रोलर्सच्या सल्ल्यावर विकीची मजेशीर Reaction

सोशल मीडियावर विकीचे फॉलोअर्स अनेक असले तरी तो बऱ्याचदा ट्रोलही होतो.

प्रणाली मोरे

विकी कौशल(vicky Kaushal) आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उरी,राझी संजू,मसान,सरदार उधम सिंह,लस्ट स्टोरीज अशा सिनेमांतून वेगवेगळ्या भूमिका साकारत विकीनं आपल्या चाहत्यांच्या संख्येत स्वबळावर वाढ केली आहे. सोशल मीडियावर देखील त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण असं असूनही काही दिवसांपूर्वीपर्यंत इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे विकीलाही सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं गेलंय.

एका मुलाखतीत विकीवरील त्या ट्रोलिंगचा उल्लेख केला गेला अन् अनेकांसाठी तो चर्चेचा विषय ठरला. एका नेटकऱ्यानं चक्क विकीला म्हटलं होतं,'आयुष्यात यश मिळाल्यावर सलमान खानसारखं बनू नकोस'. फिल्मफेअरच्या मुलाखतीत विकीला त्याच्या या ट्रोलिंगवर उत्तर द्यायला सांगितलं होतं. त्यावर विकीनं ज्या पद्दतीनं प्रश्नाला चकमा दिला होता तो पाहण्यासारखा होता. पहिलं तर विकी दोन मिनिटं काही बोलूच शकला नाही पण नंतर लगेच ''हा फिर?'' असं बोलून पुढच्या ट्रोलिंग ट्वीटकडे वळूया म्हणाला. आता सलमानशी पंगा घेतल्यावर काय होतं हे विकीला चांगलंच माहित असणार. तेव्हा स्वतःहून आगीत कोण उडी मारायला जाणार. तेव्हा विकीनं सुवर्णमध्य साधत प्रश्नाला व्यवस्थित कलाटणी देत पुढे निघून गेला.

विकी आणि कतरीना लग्नानंतर पहिल्यांदाच स्टायलिश रेड कार्पेट लूकमध्ये दिसले ते अपूर्वा मेहताच्या बर्थ-डे पार्टीत. ही पार्टी करण जोहरनं अपूर्वसाठी आयोजित केली होती. या पार्टीत कतरिना सुपरहॉट आणि विकी एकदम रॉकिंग अंदाजात दिसत होते. या दोघांनी लग्नानंतरची त्यांची पहिली होळी देखील आपल्या कुटुंबासोबत साजरी केली. विकी लवकरच 'सॅम बहादूर' सिनेमात दिसणार आहे. विकी सोबत या सिनेमात सान्या मल्होत्रा देखील काम करीत आहे. 'गोविंदा नाम मेरा','अश्वत्थामा','तख्त' असे विकीचे सिनेमे देखील रांगेत आपल्या भेटीस येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT