Siddhartha Chandekar, Mitali Mayekar Google
मनोरंजन

मितालीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी छेडला तक्रारीचा सूर; पहा व्हिडीओ

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत गेल्याच वर्षी अभिनेत्रीनं लग्नगाठ बांधली होती.

प्रणाली मोरे

मिताली मयेकर(Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar) हे मराठी सिनेसृष्टीतील एक हॅपनिंग कपल. त्या दोघांनी काही वर्ष एकमेकांसोबत लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतरच गेल्यावर्षी लग्नाचा निर्णय घेत अगदी पारंपरिक पद्धतीनं थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद घेत एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. पुण्यातील एका वाड्यात खूप थाटामाटात यांचा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नानंतर हे दोघे मुंबईत राहतात. दोघांचा मस्त संसार सुरू आहे हे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओतून आपण पाहतच असतो. सिद्धार्थपेक्षाही मिताली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. मितालीला पर्यटनाचा आनंद घ्यायलाही फार आवडते. त्यामुळे अनेकदा ती ज्या पर्यटन स्थळांना भेट देते तिथले छान-छान व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. तर मितालीमुळे आपल्यालाही पर्यटनाचा छंद लागल्याचं सिद्धार्थनेही ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत सांगितलं होतं.

सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं मितालीनं सिद्धार्थविषयी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आज मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. त्यानिमित्तानं मितालीनं तिच्या सोशल मीडियावर लग्नसोहळ्याच्या आठवणींना एकत्र करीत एक छान व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिच्या लग्नातल्या मेहेंदीच्या दिवशी चित्रित केलेले काही क्षण तिनं त्या व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिनं हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहेंदी लावली आहे. पण ती म्हणतेय,'' मी इथे इतका वेळ याच्या नावाची मेहेंदी लावत बसली आहे आणि सिद्धार्थ साधी माझी चौकशी सुद्धा करायला इथे आला नाही''. असा तक्रारीचा सूर मिताली इथे ओढताना दिसत आहे. तिनं त्यासोबतच या व्हिडीओला एक छान कॅप्शनही दिलं आहे. तिनं म्हटलंय,''मी हे सगळं मनापासून बोलतेय. या वेड्या माणसासोबत संसाराचं एक वर्ष पूर्ण''. आता संसार म्हटलं की रुसवे-फुगवे होणारंच. फक्त त्यातनंही मार्ग काढीत केलेलं लग्न यशस्वी करणं,संसार सुखी करणं हे मिताली-सिद्धार्थला चांगलं कळलेलं दिसतंय. मितालीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT