aadesh bandekar on ketaki chitale sakal
मनोरंजन

'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही..' केतकी चितळेवर आदेश बांदेकर संतापले..

संस्कार आणि संस्कृती विसरून विधानं करणं हे...' अशा शब्दात केतकी चितळे प्रकरणावर आदेश बांदेकर व्यक्त झाले आहेत.

नीलेश अडसूळ

अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली. (Ketaki Chitale made offensive post about Sharad Pawar) या प्रकरणी केतकी चितळेवर आतापर्यंत बारा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर न्यायालयाने तिला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या विधानवरून गेली दोन दिवस तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनीही आपले मौन सोडले आहे. (aadesh bandekar )

केतकीने शरद पवार यांच्यावर मर्यादा ओलांडून टीका केली . केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही कविता तिने पोस्ट केली. यात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. केतकीचे ही पोस्ट व्हायरल झाल्याने तिला ती चांगलीच भोवली आहे.

अभिनेते आणि शिवसेनेतील एक महत्वाचे नेते आदेश बांदेकर (adesh bandekar) यांनीही केतकीचा निषेध केला आहे. 'संस्कार आणि संस्कृती विसरून विधानं करणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायच नाही. ज्येष्ठांचा आदर राखणं फार गरजेचं आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे याविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही.'अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT