aai kute kay karte fame actor niranjan kulkarni started his own cafe restaurant in thane  sakal
मनोरंजन

Video: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने सुरू केलं स्वतःचं हॉटेल.. कधी, कुठे आणि कसे जाल इथे..

अभिनेता निरंजन कुलकर्णीचं मोठं पाऊल..

नीलेश अडसूळ

aai kute kay karte: सध्या मराठी मनोरंजन व्यवसाय सुरू करण्याचे वारे वाहू लागले आहेत. कुणी हॉटेल सुरू करतंय कुणी फॅशन ब्रँड.. अशातच आई कुठे काय करते फेम अभिनेत्याने हॉटेल सुरू केले असल्याचे समोर आले आहे.

आई कुठे काय करते ही मालिका सध्या खूप जोरदार प्रतिसादात सुरू आहे. या मालिकेतील एक महत्वाचा कलाकार म्हणजे अभिनेता निरंजन कुलकर्णी. या मालिकेत टू अरुंधतीच्या मुलाची म्हणजे 'अभिषेक'ची भूमिका साकारत आहे.

त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची बरीच पसंती मिळाली, आता हा अभिनेता व्यावसायिक झाला आहे. अभिनयासोबतच त्याने स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेयर केला. ज्यामध्ये तो स्वतःच्या हॉटेलात चहा बनवता दिसत आहे. या व्हिडिओची सध्या बरीच चर्चा आहे.

(aai kute kay karte fame actor niranjan kulkarni started his own cafe restaurant in thane )

निरंजनने ठाण्यात स्वत:चा कॅफे सुरु केला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्याला सर्व चाहत्यांना आमंत्रण दिले आहे. '' रिमझिम पाऊस आणि माझ्या हातचा चहा.. कधी येताय प्यायला?'' असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे.

या कॅफेमध्ये चहा बनवतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एखाद्या सुगरणीलाही लाजवेल इतक्या शिताफिने निरंजन चहा बनवत आहे. एवढेच नाही तर तो चहा कपात भरून तो ग्राहकांना सर्व देखील करत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करीत निरंजनला त्याच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणे घोडबंदर, आनंद नगर परिसरात हा कॅफे असून 'बडिज् सॅंडविच' असे या कॅफेचे नाव आहे.

मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक कलाकार व्यवसायाकडे वळत आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुलाने म्हणजे सत्याने देखील अलीकडेच रेस्टॉरंट सुरू केले. तसेच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलानेदेखील ठाण्यात स्वत:चा व्यवसाय सुरु केला. अभिनेता यशोमान आपटे याने देखील ठाण्यात कॅफे सुरू केला आहे. त्यात आता निरंजन देखील हॉटेल व्यवसायाकडे वळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT