Aai Kuthe Kay Karate Rupali Bhosale esakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karate: हम बने तुम बने इक दूजे के लिए.. रूपाली पडली प्रेमात.. पण कोण आहे तो ?

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वात सध्या मालिकांचं वर्चस्व दिसतयं. त्यातच स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते ही सर्वांची लोकप्रिय मालिका आहे. आई कुठे काय करते मालिकेत संजना म्हणजेच रुपाली भोसले ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिची मालिकेतील भूमिका लोकप्रिय आहे. रुपाली ही सोशल मीडियावरील वावरही मोठा आहे. नेहमी ती तिच्या पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेत असते.

तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला तिच्या चहत्यांना फार आवडतं. त्यातच तिची एक पोस्ट सध्या व्हायरल होतं आहे. ज्यात तिने आपण दोघे एकमेंकासाठीच बनले आहोत असं लिहिलयं. त्यामूळं संजनाच्या आयुष्यात कुणाची एंट्री झाली आहे असा प्रश्न निश्चितच तिच्या चाहत्यांना पडला असेलं.. तर याचं उत्तरही आहे ते म्हणजे मुंबई ट्रॅफिकवर आहे.

ट्रॅफिक जाममूळे सर्वच वैगतागतात. त्यामूळे कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होतो आणि दिवसभर चिडचिड होत असते. त्यात मुंबई ट्रॅफिक असेलं तर विषयच नाही. सर्वसामान्याबरोबरच कलाकारही यामूळे वैतागतात. अशाच एका वाहतूक कोंडीत रुपाली अडकलेली आहे. ती जाममूळे फार वैतागली मात्र तिनं चिडचिड न करता वाहतूक कोंडीवर छानशी लव्ह नोटचं लिहिली आहे. होय, रुपालीने एक व्हिडिओ शेअर करत वाहतूक कोंडीत माणसाची कशी कोंडी होते यावर तिचा अनूभव शेअर केला आहे.

हेही वाचा:  संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

तिने लिहिले, ट्रॅफिक आणि मी एकमेकांसाठीच बनलो आहोत. मला शुटिंगच्या सेटवर पोहोचायला फक्त ७ मिनिटे लागतात. त्यासाठी मी ठाण्याला शिफ्ट झाली. मला वाटलं यामुळे मला स्वत:ला वेळ देता येईल. पण ट्रॅफिकचे माझ्यावर खुपच प्रेम आहे. तो मला एकटीला सोडतच नाही. केवळ ७ मिनिटाच्या अंतरावर जायला आज १ तास लागला. Time is money हे चुकीचं आहे हं...असे तिनं कॅप्शन दिलं आहे. त्याचं बरोबर रुपालीने या व्हिडिओला 'मान मेरी जान' हे गाणंही लावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT