milind gawali
milind gawali 
मनोरंजन

आई कुठे काय करते: १४ वर्षांनंतर मिलिंद गवळींची 'त्या' बालकलाकाराशी भेट

स्वाती वेमूल

'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या लोकप्रिय मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी Milind Gawali यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या मालिकेच्या सेटवर तब्बल १४ वर्षांनी त्यांची भेट एका बालकलाकाराशी झाली. २००६ साली 'कालभैरव' या चित्रपटात समर्थने मिलिंद यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. तेव्हा समर्थ जेमतेम वर्षभराचा होता. आता तोच समर्थ मोठा झाला असून त्याने मालिकेच्या सेटवर मिलिंद गवळी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत मिलिंद यांनी जुनी आठवण सांगितली आहे. चित्रपटाच्या सेटवर कशाप्रकारे समर्थने कोब्राला स्पर्श केला होता आणि तो सीन शूट करताना मिलिंद यांच्या अंगावर शहारे आले होते, हे सर्व त्यांनी शब्दांत मांडलंय.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर माझी समर्थशी भेट झाली. बरोबर १४ वर्षांनंतर मी त्याला पाहिलं. सतीश रणदीवे दिग्दर्शित 'कालभैरव' या मराठी चित्रपटात त्याने माझ्या मुलाची भूमिका साकारली होती. तेव्हा तो एक जेमतेम वर्षभराचा होता. कोब्रासोबत समर्थचा सीन शूट करण्यात आला होता, तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: काटा आला होता. कोल्हापुरातीली किशाभाऊ माळ्यातील शूटिंगचा तो दिवस मला अजूनही आठवतोय. समर्थचे आईवडीलसुद्धा शूटिंगला उपस्थित होते. मी त्यांना विचारलं, "तुमच्या मुलाला सापाच्या इतक्या जवळ जाऊ देताना तुम्हाला भीती नाही का वाटली?" त्यावर ते म्हणाले, "आम्ही सर्पमित्र आहोत आणि बरीच वर्षे सापांना हाताळत आहोत."

'मी माझ्यासाठी नाही तर त्या लहान मुलासाठी घाबरलो होतो. तो खूप लहान होता आणि त्याला काहीच समजत नव्हतं, म्हणून आजपर्यंत मला शूटिंगचा तो दिवस आठवतो आणि मला अजूनही तो सीन खूप धोकादायक वाटतो. समर्थने स्पर्श केल्यानंतरही कोब्राने त्याला काहीच केलं नव्हतं. आज जेव्हा शीतलने (मालिकेत निलिमा) मला सांगितलं की तिच्या मित्राच्या मुलानेच ती भूमिका साकारली होती आणि तो मला भेटायला येणार आहे, तेव्हा मला फार उत्सुकता वाटली. समर्थ रत्नागिरीहून मुंबईला आला होता आणि त्याला भेटून मला फार आनंद झाला. २००६ साली शूट केलेल्या 'कालभैरव' चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या. शूटिंगदरम्यानचे काही फोटो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्या अंगावर काटा का आला होता, हे तुम्हाला फोटो पाहून नक्कीच समजेल.'

मिलिंद गवळी हे 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंचा गुंड गजा मारणेने केला सत्कार, वाद निर्माण होण्याची शक्यता

Tata Group: टाटा समूहाच्या अध्यक्षांची मोठी भविष्यवाणी! 2030 पर्यंत लोकसंख्येचा 50 टक्के भाग...

Chandu Champion: 'चंदू चॅम्पियन' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणाले, "कार्तिकचा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स"

Maharashtra Politics: '...अन्यथा तुमचं सरकार अडचणीत येईल', भाजप नेत्याचा CM शिंदेंना इशारा, म्हणाले 'हीच योग्य वेळ...'

Benefits Of Namaste: मेलोनींकडून G7 च्या पाहुण्यांचे 'नमस्ते' म्हणत स्वागत, जाणून घ्या नमस्काराचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

SCROLL FOR NEXT