Aai Kuthe kay karte actress ashvini mahangade post, new car photo viral instagram
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte मालिकेतील अनघाच्या खऱ्या आयुष्यात नव्या मेंबरची एन्ट्री..पोस्टनं वेधलं लक्ष

अश्विनी महांगडेनं तिच्या इन्स्टा अकाउंटवर काही फोटो पोस्ट करत 'वडीलांचे स्वप्न' असं कॅप्शन त्या पोस्टला दिलं आहे.

प्रणाली मोरे

Aai Kuthe Kay Karte: सध्या आई कुठे काय करते मालिकेत रंजक वळणं येत आहेत. मालिकेत आता अनघा आणि अभिजित या व्यक्तीरेखांभोवती कथा फिरताना दिसतेय. दोघांना नुकतीच मुलगी झालेली दाखवलीय अन् दुःखी अनघाच्या आयुष्यात त्या कारणानं आनंदाचे चार क्षण वाट्याला आलेले आहेत.

पण ही अनघा साकारणाऱ्या अश्विनी महांगडेच्या वैयक्तिक आयुष्यातही अशीच आनंदाची गोष्ट घडली आहे.

आपल्या मेहनतीने कार खरेदी करणे हा एक आपल्या आयुष्यातील वेगळा क्षण आणि आनंद असतो आता असाच आनंद . आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अनघा म्हणजे अभिनेत्री अश्विनी महांगडे साजरा करत आहे.

अश्विनी महांगडेच्या परिवारात झाली आहे नवीन मेंबरची एंट्री. अश्विनी महांगडे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.

२०२२ अश्विनीसाठी खुप आनंदाच आहे ठरलं आहे. अश्विनी महांगडे Mahindra XUV 300 रेड कलरची नवीन कार खरेदी केली आहे. यांची माहिती तिने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केली आहे आहे‌. तिने एक पोस्ट आणि कार सोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्ट मध्ये लिहिले आहे " 'तुमची खरी मेहनत तुम्हाला फळ देतेच..नानांचे स्वप्न,नानांचा आशीर्वाद"

अश्विनीनं कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होता त्या दरम्यान आपल्या वडलांना गमावलं होतं. त्यावेळी भावूक झालेली अश्विनी सगळ्यांनीच पाहिली असेल.

अश्विनीच्या गाडी इतकंच फोटोत लक्ष वेधून घेत आहे ते तिचा मराठमोळा नववारीचा साज. अश्विनीने नववारी ,नाकी नथ घालुन कारची ओपनिंग केली आहे. तिच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचं तिनं सांगितलं.

संभाजी महाराज मालिकेत रानुबाईची भूमिका साकरणाऱ्या अश्विनी महांगडेला 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनघाच्या भूमिकेनं खरी ओळख मिळवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT