Rupali Bhosle Esakal
मनोरंजन

Rupali Bhosle: 'आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी..', रुपाली भोसलेची 'ही' पोस्ट प्रत्येक स्त्रीला करेल भावूक

रुपाली भोसलेनं साडीतील एक फोटो पोस्ट करत त्याच्याशी जोडलेल्या आपल्या आठवणी देखील शेअर केल्या आहेत.

प्रणाली मोरे

Rupali Bhosle: 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झालेली रुपाली भोसले उर्फ संजना सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा आपल्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यातील अनुभव सांगताना दिसत असते. गेल्या काही दिवसांपासून तर तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नुकतीच रुपालीनं केलेली एक भावूक पोस्ट चर्चेत आली आहे. तिनं एक खास साडी नेसलेला फोटो देखील पोस्ट सोबत शेअर केला आहे. चला काय म्हणालीय रुपाली तिच्या पोस्टमध्ये जाणून घेऊया. (Aai Kuthe Kay Karte Actress Rupali Bhosale post on sari)

रुपालीनं एक फोटो शेअर केलाय ज्यात तिनं गुलाबी रंगाची साडी नेसली आहे,ज्यात ती खरंच खूप सुंदर दिसत आहे.

तो फोटो पोस्ट करत तिनं लिहिलं आहे,''आपल्याकडे कितीही कपडे असले किंवा साड्या असल्या तरी आईची साडी नेसण्याची मज्जा वेगळीच असते. मी नेसलेल्या या साडीचा अनुभव देखील काहीसा असाच आहे. खूप प्रेम,उबदारपणा,वेगळा आत्मविश्वास, आपलेपणाचा सुंगध आणि सुरक्षेचं कवच..''

''मला खरंच काही मेहनत घ्यावी लागली नाही ही साडी नेसायला अन् सुंदर दिसायला. कारण आपोआप ही साडी नेसल्यावर एक वेगळाच ग्रेस,औरा,चमक आणि मनाला फिलिंग गूडचा अनुभव..सगळं आपसुक आलं''.

''आपण छान दिसतोय हे कुठेतरी आपल्याला माहित असतं सगळ्यांना. पण या साडीमुळे आणि त्यातही खासकरून ही आईची साडी असल्यामुळे मी खरंच सुंदर दिसत होते''.

रुपाली भोसले आता केवळ अभिनेत्री राहिलेली नाही तर अनेक ब्रॅन्ड्सची ब्रॅन्ड अॅम्बेसिडर देखील ती आहे. एका दागिन्याच्या ब्रॅन्डच्या जाहिराती निमित्तानं तिनं घातलेल्या साड्या आणि पारंपारिक दागिन्यांचा साज काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भलतंच व्हायरल झालं होतं.

सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना अनेकांना आवडतेय ते तिच्या बदललेल्या ट्रॅकमुळे. संजना आता देशमुखांची सून म्हणून चांगलं वागताना दिसतेय पण एक माणूस म्हणून ती चांगली वागतेय हे प्रेक्षकांना कुठेतरी आवडतंय. पण कटकारस्थानं करणारी,अरुंधतीचं घर तोडणारी संजना देखील कुठेतरी आवडलीच होती म्हणूनच तर संजना प्रसिद्ध झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील मानाच्या तिन्ही गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

माेठी बातमी! 'शाळांना २० टक्के टप्पा अनुदानासाठी २० अटी'; प्रस्ताव ऑफलाइन अन्‌ आदेश मिळणार ऑनलाइन, अटी पूर्ततेची होणार खातरजमा

Mumbai Ganesh Visarjan 2025 : लालबागच्या राजासह मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी सज्ज; सकाळपासूनच सुरू होणार मिरवणुका!

Asian Hockey Cup 2025 : भारत अंतिम फेरीपासून केवळ एक पाऊल दूर; आज चीनला हरविणे आवश्यक

SCROLL FOR NEXT