abhishek and amruta deshmukh 
मनोरंजन

'आई कुठे काय करते?' मालिकेतील 'यश'ची सख्खी बहीण आहे ही लोकप्रिय अभिनेत्री

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे अनिरुद्धसोबतच्या नात्याचा गुंता सोडवत असताना आता अरुंधतीसमोर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या मालिकेत अरुंधतीचा मुलगा अर्थात यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारतोय. अभिषेकची ऑफस्क्रीन बहीणसुद्धा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री आहे अमृता देशमुख. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेली अमृता नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. अमृताने 'तुमचं आमचं सेम असतं', 'अस्मिता', 'पुढचं पाऊल' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर 'फ्रेशर्स' या मालिकेत तिने साकारलेली परीची भूमिका चांगलीच गाजली होती. अमृताने मालिकांसोबतच चित्रपटातही काम केलं. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'स्वीटी सातारकर' या चित्रपटात ती झळकली होती. 

अमृता अनेकदा तिच्या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिषेक यशची भूमिका साकारत असून त्याच्या कामाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. अभिषेकने 'पसंत आहे मुलगी' या मालिकेत भूमिका साकारली होती. बहिणीप्रमाणेच अभिषेकचाही सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे ९० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवं वळण
मालिकेत अरुंधतीसमोर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे यश गौरीचं नव्याने खुलणारं नातं, तर अनघा आणि अभिषेकच्या नात्याची नव्याने होणारी सुरुवात तर दुसरीकडे इशाचं अनोळखी मुलामध्ये गुंतणं. आई म्हणून अरुंधतीने आतापर्यंत आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मुलांना लहानाचं मोठं करणं, त्यांचं शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यात अरुंधतीने कोणतीही कसर राहू दिली नाही. मुलांच्या जोडीदाराच्या निवडीमध्ये देखील अरुंधती त्यांना मोलाची साथ देणार आहे. यश गौरीचं नातं अनिरुद्धला पटलेलं नसलं तरी अरुंधतीने मात्र ठाम भूमिका घेत या दोघांच्या नात्याला होकार दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT