Madhurani Prabhulkar
Madhurani Prabhulkar Sakal Digital
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्रीला नेत्याच्या हॉटेलमध्ये गंडा

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुळकरची चक्क फसवणूक झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून हॉटेल बुक करताना हि फसवणूक झाल्याचे आढळले आहे.

लोकप्रिय 'मालिका 'आई कुठे काय करते' फेम मालिक फेम अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आणि त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांना ऑनलाईन पद्धतीने 17 हजाराचा गंडा घातला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी त्यांनी ऑन लाईन पद्धतीने हॉटेल बूक केले होते. गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेल त्यांनी दोन दिवसासाठी 17 हजार रुपये देऊन बूक केले होते.

ऑनलाइन बूकिंग नंतर ते तिथे गेल्यानंतर वेगळेच प्रकऱण पुढे आले. हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने कोणतीच बूकिंग झाली नसल्याचे तिथे दिसले. प्रमोद प्रभुलकर यांनी तिथल्या मॅनेजमेंटला याबाबत चौकशी केली असता मॅनेजमेंट उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप प्रमोद प्रभुलकर यांनी केला आहे. ही रिसॉर्ट शिवसेना नेते रवींद्र फाटक यांचे असल्याचे मॅनेजमेंटने सांगितले. ही हॉटेल 4 स्टार दर्जाचे असून या ठिकाणी फसवणूक झाल्याने मोठा धक्का बसला आहे.

परंतु ही फसवणूक हॉटेलकडून झालेली नसल्याचेही यावेळी उघड झाले. काही उत्तर भारतीय व्यक्तींनी हॉटेलची साईट हॅक केल्याचे यावेळी लक्षात आले. प्रभूलकर यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीची एक लाख साठ हजारांची फसवणूक झाल्याचा व्हिडओ माध्यमात व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT