rupali bhosle, ankit magare Instagram
मनोरंजन

'आई कुठे काय करते' फेम रुपाली-अंकितचं ब्रेकअप?

पुण्यातल्या शॉपिंग मॉलमध्ये रुपालीने गुडघ्यावर बसून अंकितला केलं होतं प्रपोज

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले Rupali Bhosle सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपाली आणि तिचा प्रियकर अंकित मगरे Ankit Magare यांचं ब्रेकअप झाल्याचं समजतंय. रुपालीने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करत अनेकदा रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली होती. मात्र काही कारणास्तव या दोघांमध्ये वाद झाले असून त्यानंतर त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रुपालीसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर अंकितसोबतचे फोटो पोस्ट करण्याचं टाळत आहे.

रुपाली आणि अंकित यांची पहिली भेट एका कॉफी शॉपमध्ये झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांच्या मनात एकमेकांविषयी आकर्षण निर्माण झालं. "अंकित माझ्या कामाचा फार आदर करतो. त्याच्या कामात तो कितीही व्यग्र असला तरी माझ्यासाठी तो वेळ नक्की काढतो", असं रुपाली एका मुलाखतीत म्हणाली होती. तर "रुपाली माझी फार काळजी घेते आणि माझ्या कामात मला खूप साथ देते", अशा शब्दांत अंकितने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

पुण्यातल्या एका मॉलमध्ये रुपालीने अंकितला प्रपोज केलं होतं. "पुण्यातील एका मॉलमध्ये आम्ही फिरत होतो. त्यावेळी रुपाली अचानक काही सेकंदांसाठी गायब झाली होती. नंतर ती जेव्हा माझ्यासमोर आली तेव्हा तिच्या हातात गुलाबाचं फूल होतं. मॉलमध्ये गुडघ्यावर बसून तिने मला प्रपोज केलं होतं. तो क्षण माझ्यासाठी खूप खास आहे", असं अंकितने सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT