Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update vat paurnima veena arundhati
Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update vat paurnima veena arundhati sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या नव्या संसारात वीणाची लुडबूड, ऐन सणाच्या दिवशी..

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update: आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणार आहे. मालिकेत काही दिवसांपुर्वीची आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झालीय.

विशेष म्हणजे वीणा ही अनिरुद्धची बिझनेस पार्टनर आहे. शिवाय तिचा अनिरुद्धवर प्रचंड विश्वास आहे,. त्यामुळे अनिरुद्ध आणि वीणा अरुंधतीच्या संसारतली मोठी अडचण बनले आहेत.

अनिरुद्ध आशुतोष आणि वीणा यांच्यामध्ये फुट पाडत आहे. त्यान कट कारस्थान करून वीणाच्या कंपनीतून आशुतोषचा वाटा काढून टाकला, त्याने गोड बोलून वीणाचं मन देखील जिंकलं.

आता तो वीणाला अरुंधतीविषयी भडकवत आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला ज्यामध्ये वीणा आता अरुंधतीच्या वैयक्तिक आयुष्यातही हस्तक्षेप करताना दिसत आहे.

(Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update vat paurnima veena arundhati)

या (Aai Kuthe Kay Karte)मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, यामध्ये वीणा अरुंधतीच्या मार्गात येताना दिसत आहे. व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसते की, 'अरुंधती नटून, छान तयार होऊन वट पौर्णिमेच्या सणाला निघालेली असते. तिला अनिरुद्धच्या आईने म्हणजे कांचन ताईने आमंत्रण दिलेलं असतं. त्यामुळे अरुंधती तिच्या पहिल्या सासरी जाऊन वडाची पूजा करणार असते. '

'अरुंधती पूजेसाठी निघते, तेव्हा तिची सासू म्हणजे आशुतोषची आई म्हणते तू जा तिथे पूजा करायला, माझं कांचन ताईंशी बोलणं झालं आहे, माझी काहीच हरकत नाही. त्यानंतर अरुंधती पूजा करायला निघते,तोवरच वीणा तिला आडवी येते.'

'वीणा अरुंधतीला म्हणते, ही कोणती पद्धत. हिने का जावं तिथे.. आपल्या नवऱ्यासाठीची पूजा करायला कुणी आपल्या पहिल्या नवऱ्याच्या घरी जातं का.. आणि मग अनिरुद्धचं काय.. असं म्हणून ती अरुंधतीला अडवते.' आता वीणा अरुंधतीच्या मार्गात कोणते अडथळे आणणार हे आगामी भागात कळेलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT