Aai Kuthe Kay Karte Esakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: कॅंडल लाइट डिनर..हातात हात अन् भिडली नजरेला नजर.. आशुतोष-अरुंधतीचा पहिला रोमॅंटिक सीन व्हायरल

अरुधंतीचं लग्न, लग्नानंतर तिचा बदललेला लूक, तिचा आशुतोष सोबत नव्यानं सुरु झालेला संसार आणि त्यांच्यातील क्यूट प्रेमाचे क्षण.. सगळं सध्या भलतंच गाजतंय.

प्रणाली मोरे

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' या मालिकेनं अरुंधती-आशुतोषच्या लग्नानंतर टीआरपी रेटमध्ये मोठी झेप घेतलेली दिसत आहे. अरुधंतीचं लग्न, लग्नानंतर तिचा बदललेला लूक, तिचा आणि आशुतोषचा नव्यानं सुरु झालेला संसार आणि त्यांच्यातील क्यूट प्रेमाचे क्षण...सारंच प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे.

खरंतर सुरुवातीला अरुंधतीचं लग्न दाखवलं गेलं तेव्हा अनेकांनी त्यावर टिका देखील केली होती. पण अरुंधती ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरनं पोस्ट करत चोख उत्तर टिकाकारांना दिलं होतं.

असो..सध्या या मालिकेतील अरुंधती-आशुतोषमध्ये फुलणाऱ्या नात्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर भलतेच ट्रेन्डिंगला आहेत. नुकताच त्यांचा एक रोमॅंटिक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Romantic Scene viral)

अरुंधतीला आशुतोष लग्नानंतरचं पहिलं सरप्राईज देताना दिसणार आहे. या सरप्राईजनं अरुंधतीच्या आयुष्यात पहिल्यांदाच एक अशी गोष्ट घडणार आहे जी तिनं उभ्या आयुष्यात अनुभवली नाही.

तर सध्या या व्हायरल होणारा अरुंधती-आशुतोषच्या रोमॅंटिक व्हिडीओत आपण पाहू शकतोय की आशुतोष अरुंधतीला घेऊन रोमॅंटिक डेट सेलिब्रेट करतोय ती देखील घरात. हो पण अर्थातच तो बडा व्यावसायिक असल्यानं त्याची ही डेट एखाद्या आऊटडअरच्या रोमॅंटिक जागेपेक्षा भन्नाट असणार हे नक्की.

छान फुलांची सजावट..कॅंडल्सचा मंद प्रकाश आणि डीनरचा थाट..असं सारं वातावरण व्हिडीओत दिसत आहे. आणि याच डेट निमित्तानं अखेर आशुतोष कॉलेजपासून अरुंधती विषयी त्याच्या मनात जे- जे दडलंय ते मोकळेपणाने बोलून टाकताना दिसत आहे..

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. प्रेक्षकांना अरुंधतीला आशुतोषनं दिलेलं हे सरप्राईज भलतंच आवडलं आहे आणि सगळेच या एपिसोडची वाट पाहत आहेत.

पण काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट केल्या आहेत. त्यातली एक कमेंट खूपच फनी आहे.

त्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे,''घरातल्या घरात काय सरप्राईज द्यायचं.. आहे ना आशुतोष मोठ्ठा बिल्डर मग जाऊ दे घेऊन आमच्या अरुला दोन चार दिवस जरा मुंबई बाहेर करु दे दोघांना सोबत enjoy दिग्ददर्शकांनी विचार करावा''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : पिकविमा जुलैमध्ये सुरू करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT