aai kuthe kay karte 
मनोरंजन

'आई कुठे काय करते' मालिकेतील कलाकारांचा मजेशीर REEL व्हिडीओ

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते aai kuthe kay karte या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर या कलाकारांना चाहते फॉलो करतात. मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले Rupali Bhosle हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतील मालिकेतील सर्व कलाकार पहायला मिळत आहेत.

'कभी खुशी, कभी गम', हे गाणं सर्व कलाकार मिळून गाताना दिसत आहेत. गाण्याच्या चार ओळी एकत्र म्हटल्यानंतर सर्वजण निघून जातात. फक्त संजना आणि अरुंधतीच तिथे राहतात. नंतर या दोघीसुद्धा तिथून निघून जातात. रुपालीच्या या मजेशीर रील व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

आई कुठे काय करते ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला लग्नाचे वेध लागले आहेत. गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आलाय. ३० ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे. अनिरुद्धसोबत लग्नगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT