Aai Kuthe Kay Karte serial latest update arundhati and ashutosh intimate scene love star pravah sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषमध्ये जवळीक.. 'त्या' हळव्या क्षणांचा व्हिडिओ होतोय व्हायरल..

'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट..

सकाळ डिजिटल टीम

Aai Kuthe Kay Karte: सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका चांगलीच रंजक वळणावर आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या नव्या संसाराची सुरुवात झाली आहे. वयाच्या अशा टप्प्यावर लग्न केल्याने दोघांमधील प्रेम फुलण्यासाठी वेळ लागत आहे.

पण आता त्यांच्यातील सहवास वाढल्याने प्रेम ही उमलत आहे. आपण पाहतो की अरुंधती आणि आशुतोष एकमेकांना समजून घेऊन संसार करत आहेत. पण आता त्यांच्यात जवळीक वाढत आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये अरूंधती आणि आशुतोष मधील गोड संवाद आणि हळवे क्षण दिसून आले आहेत.

(Aai Kuthe Kay Karte serial latest update arundhati and ashutosh intimate scene love star pravah)

अरुंधती-आशुतोषच्या लग्नानंतर या मालिकेच्या टीआरपी रेटमध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे. अरुधंतीचं लग्न, लग्नानंतर तिचा बदललेला लूक, तिचा आणि आशुतोषचा नव्यानं सुरु झालेला संसार आणि त्यांच्यातील क्यूट प्रेमाचे क्षण...सारंच प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे.

दोघेही एकमेकांना सावरत हा संसाराचा गाडा पुढे नेत आहेत. अनेक अडचणी येऊनही त्यावर जोड्याने ते तोडगा काढत आहेत. अगदी अरुंधतीच्या मुलांसाठी ही आशुतोष धावून जात आहे. पण एकमेकांच्या जवळ येताना मात्र काहीसे लाजताना दिसत आहेत. पण नुकतेच त्यांच्यातील गोड क्षण समोर आले आहेत.

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरुंधतीची तब्येत बिघडल्याने ती आराम करताना दिसत आहे आणि आशुतोष तिला हळुवार पणे गोंजारत आहे. तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहे.

यावेळी अरुंधती आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते. ती म्हणते 'तुमचा सहवास मला हवाहवासा वाटतो. तुम्ही जवळ असला की मला खूप बरं वाटतं. मला तुम्ही खूप आवडता आशुतोष..' त्यावर आशुतोष म्हणतो, 'तूही मला खूप आवडतेस..' हा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT