aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar
aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar  file image
मनोरंजन

आई कुठे काय करते: अरुंधतीच्या आयुष्यात होणार 'या' खास व्यक्तीची एण्ट्री

स्वाती वेमूल

मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता ही भूमिका साकारणार आहे.

टेलिव्हिजनवरील काही मालिकांना अल्पावधीतच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte ही त्यापैकीच एक मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. मालिकेच्या प्रत्येक भागात येणारं नवीन, रंजक वळण आणि कलाकारांचं दमदार अभिनय हे यशामागचा कारण आहे. सध्या या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एण्ट्री होणार आहे. या नव्या व्यक्तीची भूमिका कोण साकारणार, याबद्दलची उत्सुकता आहे.

एकीकडे मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख याने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. दुसरीकडे अविनाशची आर्थिक मदत करण्यासाठी अरुंधतीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अविनाशला मदत करताना अरुंधती मोठ्या अडचणीत सापडली आहे. अशा रंजक वळणावर मालिकेत एका खास व्यक्तीची एण्ट्री होणार आहे. अरुंधतीचा एक जुना मित्र तिच्या आयुष्यात परत येणार आहे. या मित्राची भूमिका अभिनेते समीर धर्माधिकारी साकारणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. अरुंधतीचा हा मित्र तिला तिच्या अडचणीत मदत करणार का, त्याच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ येणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर ही अरुंधतीची भूमिका साकारत आहे. तर मिलिंद गवळी अनिरुद्धच्या भूमिकेत आहेत. मालिकेत संजनाची नकारात्मक छटा असलेली भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT