omkar gowardhan 
मनोरंजन

आई कुठे काय करते: आशुतोषमुळे अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवं वादळ?

आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी व्यावसायिक आहे.

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अविनाशला पैशांची मदत करण्यासाठी अरुंधतीने समृद्धी बंगला गहाण ठेवला. ही गोष्ट देशमुख कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येकाकडूनच उलट सुलट प्रतिक्रिया मिळाल्या. अनिरुद्ध आणि संजनाने तर समृद्धी बंगला विकण्यासाठीचाच प्रस्ताव मांडला. मात्र या कठीण प्रसंगातही खचून न जाता अरुंधतीने ठामपणे उभं रहायचं ठरवलं आहे. घरात एकीकडे तणावाचं वातावरण असताना मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. आशुतोष असं या नव्या पात्राचं नाव असून अभिनेता ओंकार गोवर्धन आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी व्यावसायिक आहे. बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोषची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होणार आहे.

अभिनेता ओंकार गोवर्धन आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूपच उत्सुक असून 'आई कुठे काय करते' आणि स्टार प्रवाह कुटुंबाचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला. "आई कुठे काय करते ही मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं आहे. त्यामुळे आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी जबाबदारीचं आणि तितकंच आव्हानात्मक आहे. हे पात्रं मला अतिशय आवडलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर माझी आई कुठे काय करते मालिकेत एण्ट्री होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे," असं ओंकारने सांगितलं.

आशुतोष या पात्राच्या एण्ट्रीने मालिकेतही नवं वळण येणार आहे. आई कुठे काय करते ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई टोळीला मोठा दणका! रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील सूत्रधार गँगस्टर हॅरी बॉक्सरला अमेरिकेत बेड्या

Virat Kohli Viral Video: दिवाळीची तयारी मैदानावरच? विराटने केएल राहुलचा केला 'परफेक्ट लुक', तर भर मैदानात केली ईशान किशनची नक्कल

रस्त्याच्या बाजूला पडलेलो, एका बंगाली माणसाने... अशोक सराफ यांनी सांगितली अपघाताची आठवण; म्हणाले- ड्रायव्हर ओव्हरटेक करायला गेला अन्...

FDA Action: दिवाळीत भेसळखोरांवर 'एफडीए'चा बडगा! मुंबईतील तपासणी मोहिमेत २८ परवाने निलंबित; राजधानी बिर्याणी केंद्र बंद

Latest Marathi News Live Update: झारखंडच्या नक्षलवाद्याला ३ दिवसांची रिमांड

SCROLL FOR NEXT