Aakash Chopra Commentator KL Rahul  esakal
मनोरंजन

Aakash Chopra : 'सुनील शेट्टी मला पित्यासमान', आकाश चोप्राला नेटकऱ्यांनी धुतला, म्हणून केएल राहुलला...

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा हा त्याच्या अघळपघळ चर्चेसाठी प्रसिद्ध असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aakash Chopra Commentator KL Rahul Indian Cricketer : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा हा त्याच्या अघळपघळ चर्चेसाठी प्रसिद्ध असल्याचे दिसून आले आहे. आकाश हा गोष्टी रंगून सांगणारा व्यक्ती आहे. सध्या जेवढे भारतीय समालोचक आहेत त्यामध्ये आकाश चोप्राची लोकप्रियता मोठी आहे. त्याचे बोलणे, त्यातील कोट्या, उदाहरणं ही चर्चेचा विषय असतात.

सध्या तर आकाश चोप्रा हा वेगळ्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्यामध्ये तो आणि प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलीवूडचा अण्णा सुनील शेट्टी दिसत आहे. यावेळी आकाश चोप्रानं केलेला खुलासा त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता.त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्सदेखील भन्नाट आहेत. काही दिवसांपासून भारतीय संघाचा प्रसिद्ध फलंदाज केएल राहुल हा त्याच्या फॉर्मशी संघर्ष करताना दिसतो आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

राहुल हा टँलेटेड खेळाडू आहे. मात्र सध्या त्याच्या बॅटमधून धावा होत नसून त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाच्याविरोधात दोन्ही टेस्ट मॅचमध्ये राहुल फ्लॉप झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याची व्हाईस कॅप्टनशिप वरुन हाकलपट्टी करण्यात आली. सोशल मीडियावरुन त्याच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अशावेळी आकाश चोप्रानं त्याच्या बाजुनं मत व्यक्त केलं आहे.

आकाश चोप्राचा व्हायरल झालेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय आङे. त्यामध्ये आकाश चोप्रा सुनील शेट्टीशी बोलतो आहे. सुनील शेट्टीला आकाश चोप्रानं आपला गुरु आणि पितासमान मानलं आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला, म्हणून तर तू केएल राहुलची बाजू घेत आहे का. असा प्रश्न विचारला आहे. काही दिवसांपूर्वी केएल राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अथियाचा विवाहसोहळा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT