Aaliyah Kashyap Instagram
मनोरंजन

अश्लील सिनेमे पहायची आलिया कश्यप; सेक्स लाइफविषयी केले हैराण करणारे खुलासे

बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.

प्रणाली मोरे

बॉलीवूड दिग्दर्शिक अनुराग कश्यपची(Anurag Kashyap) मुलगी आलिया कश्यप(Aaliyah Kashyap) नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तर आलिया खूपच सक्रिय पहायला मिळते. आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही ती हातचं राखून न ठेवता सगळंच मोकळेपणाने बोलताना दिसते. ती अनेकदा आपल्या चांगल्या-वाईट वैयक्तिक अनुभवावरुन इतरांनाही काही ना काही सांगताना दिसते. एकदा तिनं मासिक पाळी,सेक्स आणि बिकिनी वॅक्स,न्युडिटी अशा अनेक चोरून बोलणाऱ्या विषयांवर बेधडक वक्तव्य करत सोशल मीडियावर लोकांशी संवाद साधला होता.(Aaliyah kashyap on porn movies and sexlife)

आता आलियानं पुन्हा एक व्हिडीओ शेअर करीत अनेक समस्यांना सोडवण्याचा एक प्रयत्न केला आहे. या व्हिडीओत तिनं सेक्स(Sex life) करण्या दरम्यान होणाऱ्या वेदना आणि पॉर्न सिनेमांचं(Porn Movie) व्यसन याविषयांवर बिनधास्त संवाद साधलाय,अर्थात अनेक खुलासे केलेयत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

आलियाच्या यु-ट्यूब वाहिनीचे 111k सबस्क्रायबर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर-व्हिडीओवर लाइक्सचा आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो. आपल्या व्हिडीओवरील एखादी प्रतिक्रिया/प्रश्न आलियाला आवडली आणि त्यावर तिला जर उत्तर द्यावंसं वाटलं तर ती थेट त्याचा व्हिडीओ बनवून पोस्ट करते. सुरुवातीला आलिया खूप सिलेक्टिव्ह होती पण आता चाहत्यांच्या विनंतीचा मान राखत तीअधिक प्रतिक्रियांवर उत्तराचे व्हिडीओ बनवत पोस्ट करताना दिसते. एकदा एका नेटकऱ्यानं तिला विचारलं की,''आलियाला कोणती लोकं अधिक आवडतात?'' तेव्हा उत्तर देताना ती म्हणाली होती,''घमेंडी लोक मला मुळीच आवडत नाहीत. आणि जे इतरांशी वाईट पद्धतीनं वागतात,खोटं वागतात,फसवणूक करतात अशा लोकांचा मला तिटकारा आहे''.

एकाने तर आलियाला थेट स्तनांच्या छोट्या आकारावरून प्रश्न केला होता. त्यावर तिनं उत्तर दिलं होतं की, ''हे खूप नॉर्मल आहे. माझे देखील स्तन छोटे आहेत आणि मला याविषयी कुठलाही खेद मनात नाही''. आलिया तेव्हा म्हणाली होती,''यामुळे अनेकदा प्रॉब्लेम्स येतात,पण मला त्यांचा कधी सामना करावा लागला नाही''. आलियाच्या म्हणण्यानुसार,जर तुमचा पार्टनर समजूतदार असेल,तर त्याला देखील तुमचे स्तन लहान की मोठे याचा फरक पडणार नाही.

आलियानं सेक्स दरम्यान रक्त वाहण्याविषयी देखील बिनधास्त वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली होती,''असं तिच्यासोबत झालेलं नाही पण हे नैसर्गिक आहे. पहिल्यांदा सेक्स करताना हाइमेन मसल्स तूटतात म्हणून ते रक्त येतं''. आलिया कश्यपने आपल्या काही फ्रेंड्सच्या बाबतीत असं झालं होतं असं देखील त्यावेळी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT