Aamir Khan And Kiran Rao esakal
मनोरंजन

Aamir Khan: आमिर खाननं एक्स वाईफ किरण राव आणि लापता लेडिजच्या टीमसोबत साजरा केला 59 वा वाढदिवस; व्हिडीओ व्हायरल

Aamir Khan: आमिरच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

priyanka kulkarni

Aamir Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 59 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आमिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आमिरनं त्याचा वाढदिवस एक्स वाईफ किरण राव (Kiran Rao), लापता लेडिज (Laapataa Ladies) चित्रपटाची टीम आणि पापाराझीसोबत त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये साजरा केला. आमिरच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान आमिर खानने उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले. त्याने 'लापता लेडिज' चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.

बर्थ-डे सेलिब्रेशन दरम्यान केक कापल्यानंतर आमिर खानने स्वत: एक्स वाईफ किरण रावला केक भरवला. तसेच लापता लेडिज सिनेमातील कलाकार स्पर्श, प्रतिभा आणि नितांशी यांना देखील त्यानं केक दिला.

पाहा व्हिडीओ:

'लापता लेडिज' या सिनेमाचं दिग्दर्शन किरण रावनं केलं आहे. नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. सलमान खान, सचिन तेंडुलकर आणि अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर करुन या सिनेमाचं कौतुक केलं.

आमिरच्या 'या' चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती

आमिर खाननं 'कयामत से कयामत तक', 'दिल' आणि 'राजा हिंदुस्तानी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. या चित्रपटांमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच 'लगान', 'तारे जमीन पर', आणि 'दंगल' या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

आमिरचे आगामी चित्रपट

सितारे जमीन पर असे हा आमिरचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबद्दल आमिरनं एका मुलाखतीमध्ये संगितलं होतं. तो म्हणाला होता, "मी या चित्रपटाबद्दल अजून जाहीरपणे बोललो नाही.आताही मी जास्त बोलू शकणार नाही. पण चित्रपटाचे फक्त टायटल सांगतो. सितारे जमीन पर असे या चित्रपटाचे नाव आहे. तुम्हाला माझा 'तारे जमीन पर' हा चित्रपट आठवला असेल आणि या चित्रपटाचे नाव सितारे जमीन पर आहे कारण त्याच थीमवर हा चित्रपट आहे. तारे जमीन पर हा भावनिक चित्रपट होता. हा चित्रपट तुम्हाला हसायला लावेल. हा चित्रपट तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT