aamir khan Sakal
मनोरंजन

Aamir Khan Birthday: ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दल या 5 गोष्टी माहितीयेत का?

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान आज आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच आमिर खान आज आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खान याने वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

‘गजनी’, ‘लगान’, ‘मंगल पांडे’, ‘थ्री इडियट्स’सारखे दमदार चित्रपट देणाऱ्या आमिरने प्रत्येक चित्रपटासाठी खास मेहनत घेतली आहे. आमिर खानबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित तुम्ही आजवर कधीच ऐकल्या देखील नसतील.

14 मार्च 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या आमिरबद्दल सगळ्यांनाच एक गोष्ट माहीत आहे, ती म्हणजे आमिर जे काही करतो ते अगदी मनापासून करतो. कधी तो 'इश्क'मध्ये पडला तर कधी 'गुलाम' झाला, पण अभिनयात तो इतका 'फना' झाला की त्याने 'तारे जमिनीवर' आणले.

आमिरने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी अभिनयाचा प्रवास सुरू केला. तो पहिल्यांदा 1973 मध्ये यादों की बारातमध्ये दिसला होता, ज्याची निर्मिती त्याचे काका नासिर हुसेन यांनी केली होती. मात्र, अभिनेता म्हणून आमिरच्या करिअरची सुरुवात 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाने झाली.

उत्कृष्ट अभिनयाबद्दल बोलणे आणि आमिर खानचा उल्लेख न करणे अशक्य आहे. मात्र, एक काळ असा होता जेव्हा आमिरने अभिनेता व्हावे असे त्याच्या वडिलांना वाटत नव्हते. एक वेळ अशी आली जेव्हा आमिरने अवांतर नावाच्या थिएटर ग्रुपसोबत दोन वर्षे काम केले. यानंतर त्याने अभिनयालाच करिअर म्हणून निवडले.

अभिनेता होण्यापूर्वी आमिरचे एकच स्वप्न होते. खरे तर त्याला टेनिसपटू व्हायचे होते. त्याच्या शालेय दिवसांमध्ये, तो टेनिस इतका चांगला खेळायचा की त्याने आपल्या शाळेसाठी अनेक राज्यस्तरीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ताकद दाखवली होती. आमिर खानचा आवडता टेनिसपटू रॉजर फेडरर आहे.

आमिर खानने जेव्हा 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. खरे तर या चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते. अशा परिस्थितीत आमिर खान स्वत: बस आणि ऑटोच्या मागे चित्रपटाचे पोस्टर चिकटवत असे. तसेच, तो लोकांना सांगत असे की या चित्रपटात तो हिरो बनला आहे.

आमिर खानला पुरस्कार सोहळ्यात जाणे आवडत नाही. याचे कारण 1990 मध्ये एक अवॉर्ड फंक्शन असल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये सनी देओलची 'घायल' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली होती. ऑस्करशिवाय इतर कोणत्याही अवॉर्ड शोवर विश्वास ठेवण्यासारखा नाही, असे आमिरचे मत आहे.

आमिर खानच्या वाईट सवयींचा उल्लेख केला तर, आमिर खानला आंघोळ करायला आवडत नाही. याचा खुलासा खुद्द त्याची माजी पत्नी किरण राव हिने केला आहे. तिने सांगितले होते की, आमिर अनेक दिवस आंघोळीशिवाय राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT