Aamir Khan Advertisement Trolled: esakal
मनोरंजन

Aamir Khan Advt: 'आमिरनं लाज सोडली'! 'घरजावई' जाहिरातीवरुन नेटकऱ्यांचा भडका

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aamir Khan Advertisement Trolled: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यानं केलेली ती जाहिरात ही काही नेटकऱ्यांना आवडलेली नाही. बऱ्याच दिवसांपासून आमिर हा नेटकऱ्यांच्या रडारवर असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या एक्स वाईफनं किरण रावनं देश सोडून जाण्याविषयी जे वक्तव्य केले होते त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते. याचा परिणाम लाल सिंग चढ्ढावर झाला आणि तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्याचे दिसून आले.

आता आमिर पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसत आहे. यावेळी त्यानं केलेली एका बँकेची जाहिरात त्याला भोवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यात आमिरनं केलेली घरजावयाची भूमिका आणि त्यातून दिला जाणारा संदेश याचा फटका आमिरला बसला आहे. यावरून तर त्याला नेटकऱ्यांनी सणसणीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमिरची लाज काढण्यापर्यत काही नेटकऱ्यांची मजल गेली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आमिरला चांगलेच झापले होते.

आमिर आणि प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी यांची ती जाहिरात आहे. त्यात आमिर हा लग्न करुन त्या मुलीच्या घरी जातो. जिचे वडील आजारी आहेत. आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तिनं घरजावई करुन आणला आहे. यावर आमिरची आता आपण जुने विचार फेकून देऊन नव्या विचारांना स्विकार केला पाहिजे अशा आशयाची प्रतिक्रिया आहे. जी नेटकऱ्यांच्या डोक्यात गेली आहे. त्यामुळे त्यांनी कडक शब्दांत आमिरला सुनावले आहे.

आमिर तू आमच्या सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावल्या आहेत. दरवेळी तू तुझ्या कलाकृतीतून आमचा अशाप्रकारे अपमान करतो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला आपण काहीच का प्रश्न विचारत नाही, आणि आपण एकसुरी पद्धतीनं काम करत असलेल्या बँकिंग व्यवस्थेला प्रश्न विचारतो असे आमिरनं त्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे. आमिरला अशाप्रकारच्या जाहिराती करताना लाज कशी वाटत नाही, असा प्रश्न सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT