Aamir Khan Bollywood actor daughter ira khan : esakal
मनोरंजन

Ira Khan Wedding : आमिरच्या लेकीची हळद, नवरीपेक्षा तिच्या दोन्ही आईंच्या लूकची चर्चा!

लग्नापूर्वीच्या हळदीचा फोटो आणि व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. हळदीच्या त्या फोटो आणि व्हिडिओला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसादही मोठा आहे.

युगंधर ताजणे

Aamir Khan Bollywood actor daughter ira khan : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा जसा त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतो त्याप्रमाणेच सध्या त्याची मुलगी चर्चेत आली आहे. त्याचे कारण इराचं लग्न. आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना यांची मुलगी इराचं लग्न चर्चेत आहे.

लग्नापूर्वीच्या हळदीचा फोटो आणि व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. हळदीच्या त्या फोटो आणि व्हिडिओला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. त्यात इरापेक्षा तिच्या दोन्ही आयांनी केलेली वेशभूषा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. किरण राव आणि रिनाचा तो मराठमोळा लूक चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमिरच्या लाडक्या लेकीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. यामध्ये कोणकोणते सेलिब्रेटी येणार, कुणाला विशेष निमंत्रण दिले गेले आहे तसेच या लग्नानंतर कोणत्या शहरामध्ये त्याचे ग्रँड सेलिब्रेशन होणार, रिसेप्शनला कोण कोण येणार, कोणत्या शहरांत होणार लग्न या विषयी वेगवेगळ्या पोस्टही व्हायरल झाल्या आहेत.

आमिरनं देखील या लग्नावरुन एका मुलाखतीमध्ये दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली होती. तो म्हणाला होता की, या लग्नामध्ये मी खूपच रडेल. कारण मी खूपच भावनाशील होईल. त्यामुळे आतापासूनच घरामध्ये मला कोण सांभाळणार याची चर्चा होत आहे. दुसरीकडे या लग्नाच्या तयारीत असल्यानं व्यस्तपणा वाढलाय. बाकी कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा सध्या लग्नावर लक्ष केंद्रीत केल्याचेही आमिरनं सांगितले होते.

मुंबई आणि राजस्थान अशा दोन शहरांमध्ये इराचा विवाहसोहळा पार पडणार आहे. पहिल्यांदा मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज होईल त्यानंतर राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटी हजर राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT