Aamir Khan Daughter Ira Khan Nupur Shikhare Wedding esakal
मनोरंजन

Ira Aamir Khan Daughter Wedding : महाराष्ट्रीयन पद्धतीनचं होणार आमिरच्या लेकीचं लग्न!

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या आमिर खानची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही.

युगंधर ताजणे

Aamir Khan Daughter Ira Khan Nupur Shikhare Wedding : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या आमिर खानची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. भलेही त्याच्या लाल सिंग चढ्ढानं प्रेक्षकांना नाराज केले असले तरी आगामी काळात त्याच्या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. या सगळ्यात आमिर खानच्या लेकीचं लग्न हा आता चर्चेचा विषय आहे.

आमिर खानची लाडकी लेक आयरा आणि नुपूर शिखरे यांचा येत्या तीन जानेवारी रोजी शाही विवाह सोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. या लग्नासाठी आमिर खाननं सेलिब्रेटींची मोठी यादीही तयार केली असून त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटी हजर राहणार आहेत. आता आयरा आणि नुपूरच्या विवाह सोहळ्याच्या तयारीविषयी आणि तो सोहळा कुठे पार पडणार आहे याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयरा आणि नुपूरचं लग्न हे महाराष्ट्रीयन पद्धतीनेच पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आयराच्या लग्नाच्या विधींचे फोटो व्हायरल झाले होते. आयरानं देखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो शेयर केले होते. त्या कार्यक्रमाला आमिर खानची एक्स वाईफ किरण राव आणि मुलगा आझाद राव हजर होते.

सहा ते दहा जानेवारी दरम्यान ग्रँड रिसेप्शन...

आमिर खानची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आय़राचं लग्न हे नुपूर शिखरे सोबत पार पडणार आहे. या लग्नावरुन आमिरनं एका मुलाखतीमध्ये दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी आमिरनं त्या लग्नासाठी सुरु केलेली जय्यत तयारी आणि शॉपिंग यांचे व्हिडिओ समोर आले होते. मीडिया रिपोर्टस नुसार, आयरा आणि नुपूरचं लग्न हे बांद्र्यामधील अलिशान ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये पार पडणार आहे.

तसेच सहा ते दहा जानेवारी दरम्यान दिल्ली आणि जयपूरमध्ये दोन रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या तरी बॉलीवूडमधील बरीचशी मंडळी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेरदेशी आहेत. त्यामुळे आय़राच्या लग्नाला नेमकं कोण कोण उपस्थित राहणार याविषयी प्रश्नचिन्ह आहे. खान कुटूंबियांकडून याविषयी अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मला तर खूपच रडू येईल...

आमिरनं आयराच्या लग्नानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिलेली ती प्रतिक्रिया खूपच चर्चेत आली होती. मी खूपच इमोशनल आहे. आणि त्यादिवशी मी तर खूप रडेल. घरात तर आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे की, त्यावेळी आमीरला कोण सांभाळणार...अशा शब्दांत आमिरनं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal CM: पश्चिम बंगालमध्ये BJP सरकार स्थापन करणार! मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची तारीखही ठरली; ब्रिगेड ग्राउंड साक्षीदार ठरणार

IPL 2026 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कॅप्टन? हार्दिकनंतर सूर्यकुमार यादवही MI vs RCB सामन्याला मुकणार?

Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक नेहमीच करतात भेदभावाचा सामना; समाजात मिळतो अपमान, पण करियरमध्ये घेतात भरारी, बनतात लखपति

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

IPL 2026 : हार्दिक पांड्याने Mumbai Indians च्या इतर खेळाडूंसोबत रायपूरला नाही गेला; RCB विरुद्ध नाही खेळणार? नेमकं काय सुरू आहे?

SCROLL FOR NEXT